Jeff Bezos Wedding : शतकातील सर्वात मोठा विवाह सोहळा… वऱ्हाड्यांना मिळणार अत्यंत महागडं खास गिफ्ट; जगभरातून येणार पाहुणे

जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेज यांचा शतकातील सर्वात मोठा शाही विवाह सोहळा 27 जून रोजी व्हेनिस येथे होणार आहे. या लग्नासाठी 80% पदार्थ स्थानिक विक्रेत्यांकडून घेतले जात आहेत. पाहुण्यांना लगुना बी कंपनीची खास भेटवस्तू देण्यात येणार असून लग्नाचा खर्च कोट्यवधींमध्ये आहे. कपलने पाहुण्यांना भेटवस्तूऐवजी दान करण्याचे आवाहन केले आहे.

Jeff Bezos Wedding : शतकातील सर्वात मोठा विवाह सोहळा... वऱ्हाड्यांना मिळणार अत्यंत महागडं खास गिफ्ट; जगभरातून येणार पाहुणे
jeff bezos wedding
Image Credit source: social media
| Updated on: Jun 25, 2025 | 1:09 PM

शतकातील सर्वात मोठा शाही विवाह सोहळा येत्या 27 जून रोजी होणार आहे. म्हणजे अवघ्या दोन दिवसांवर हा विवाह सोहळा येऊन ठेपला आहे. इटलीचं सर्वांग सुंदर शहर व्हेनिसमध्ये हा शाही विवाह सोहळा होणार आहे. ॲमेझॉनचे संस्थापक आणि बिझनेसमन जेफ बेसोज हे वयाच्या 61व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत. अमेरिकेतील लेखिका आणि पत्रकार लॉरेन वेंडी सांचेज हिच्याशी त्यांचा विवाह होणार आहे. या लग्नाला सर्वात भव्य लग्न म्हटलं जात आहे. या लग्न सोहळ्याला सिने कलाकार, राजकारणी आणि उद्योग जगतातील नामवंत हस्ती उपस्थित राहणार आहेत. तसेच या लग्नाला हजेरी लावणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला एक खास महागडं गिफ्ट दिलं जाणार आहे. त्यामुळे लग्नाबरोबरच या गिफ्टचीही चर्चा रंगली आहे.

जेफ बेजोस आणि लॉरेन सांचेज आपल्या पाहुण्यांना खास गिफ्ट देणार असल्याची चर्चा आहे. डेली मेलच्या रिपोर्टमध्ये तसं म्हटलं आहे. व्हेनिस येथील काच बनवणारी प्रसिद्ध कंपनी लगुना बीकडून पाहुण्यांना गिफ्ट म्हणून खास बॅग दिली जाणार आहे. या बॅगेत काय काय असणार? याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण ही बॅग अत्यंत खास असणार असल्याचं सांगितलं जात आहे. कपलला कोणतंही गिफ्ट देऊ नका. हवं तर तुम्ही चांगल्या कामासाठी ते दान करू शकता, असं पाहुण्यांना सांगितलं गेलं आहे.

80 टक्के खाद्यपदार्थ स्थानिकांकडून

विशेष गोष्ट म्हणजे लग्नासाठीचं 80 टक्के जेवण व्हेनिस येथील स्थानिक विक्रेत्यांकडून घेतलं जाणार आहे. यात मुरानोची प्रसिद्ध ग्लास कंपनी लगुना बी आणि व्हेनिसची सर्वात जुनी मिठाई बनवणारं दुकान साल्वाचाही समावेश आहे. जेफने लग्नासाठी पाहुण्यांना खास गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी लगुना बी या कंपनीची निवड केली आहे. त्यामुळे ही कंपनी चर्चेत आली आहे. कंपनीच्या वेबसाईटच्या नुसार, या कंपनीची सुरुवात ब्रँडोलिनीने 1994मध्ये केली होती. त्यावेळी त्यांनी गोटो नावाचा ग्लास कप तयार केला होता. मेरी पॅरीसची प्रसिद्ध ग्लास डिझायनर होती. आणि तिला काचेच्या भट्टीतून उरलेल्या मटेरियलमधून सुंदर कप बनवणाऱ्या मुरानो कारागिरांकडून प्रेरणा मिळाली होती.

खर्च अवाढव्य

या शाही सोहळ्याला सुमारे 200 हून कमी लोक येणार आहेत. जेफ आणि लॉरेन यांनी अधिक पाहुण्यांना बोलावलं नाही. फक्त निवडक पाहुणेच येणार आहेत. या लग्न सोहळ्यावर करोडो डॉलर खर्च करण्यात येणार आहेत. तसेच एका अहवालानुसार, कॉलिन कोवीसारख्या प्रसिद्ध वेडिंग प्लॅनर त्यांची फी म्हणून लग्नाच्या एकूण खर्चाच्या सुमारे 20 टक्के रक्कम घेतात. म्हणजेच जर एखाद्या लग्नाचा एकूण खर्च किमान 9.5 मिलियन डॉलर्स (सुमारे 79 कोटी रुपये) असेल, तर त्यांची फी साधारणतः 2 मिलियन डॉलर्स (सुमारे 16.5 कोटी रुपये) इतकी असू शकते. याशिवाय, लग्नाच्या कपड्यांवर, हेअरस्टाईल, मेकअप आणि फुलांच्या सजावटीवर सुमारे 4.3 कोटी रुपये खर्च येऊ शकतो. या खर्चाच्या आधारे त्या लग्नाची भव्यता आणि लक्झरी सहज समजून येऊ शकते.