Video: मोड आलेल्या कडधान्यापासून बनवलेली अनोखी चाट, कानपूरचे चाटवाले आजोबांचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल

बटाटे, पापडी, दही आणि भरपूर चटणी इत्यादीपासून बनवल्या जाणार्‍या चाटबद्दल तुम्ही ऐकले असेल, पण मोड आलेल्या कडधान्यापासून बनवलेल्या चाटबद्दल तुम्ही ऐकले आहे का? कानपूरमधील एका वृद्धाचा मोड आलेल्या कडधान्यापासून चाट बनवल्याचा अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Video: मोड आलेल्या कडधान्यापासून बनवलेली अनोखी चाट, कानपूरचे चाटवाले आजोबांचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल
कानपूरचे चाट कडधान्याची बनवणारे आजोबा
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 3:13 PM

सोशल मीडिया हे असे व्यासपीठ आहे की, जिथे तुम्ही जे काही पोस्ट करता आणि ते व्हायरल होते. इंटरनेटवर पाहण्यासारखे अनेक व्हिडिओ आहेत, काही मजेशीर आहेत तर काही हृदयाला भिडणारे आहेत. बटाटे, पापडी, दही आणि भरपूर चटणी इत्यादीपासून बनवल्या जाणार्‍या चाटबद्दल तुम्ही ऐकले असेल, पण मोड आलेल्या कडधान्यापासून बनवलेल्या चाटबद्दल तुम्ही ऐकले आहे का? कानपूरमधील एका वृद्धाचा मोड आलेल्या कडधान्यापासून चाट बनवल्याचा अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Kanpur Old man makes unique sprouts chaat in viral video Receipe goes viral people love to see that old man)

आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, जो YouTube Swadofficial नावाच्या इंस्टाग्राम पेजवर अपलोड करण्यात आला, एक वृद्ध माणूस स्प्राउट्सपासून चाट बनवताना दिसत आहे. डिश तयार करण्यासाठी, त्याने पानांपासून बनवलेल्या पत्रावळीचा वापर केला आहे. शिवाय हे करताना विविध प्रकारचे मोड आलेले कडधान्य मिसळले. नंतर त्या मिश्रणात चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या. सर्व्ह करण्यापूर्वी त्याने हिरवी चटणी टाकली आणि पांढऱ्या मुळ्याने ती सजवली.

त्याने हे सर्व वेळ कॅमेऱ्यात हसत हसत केले आणि त्याच्या या पदार्थाच्या चवीपेक्षा या आजोबांचे स्मित सर्वांचे मन जिंकत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे, सोबतच लोक त्यांच्या प्रतिक्रियाही शेअर करत आहेत.

पाहा व्हिडीओ:

व्हिडिओ शेअर करताना पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘काकाजीची कानपूरमधील सर्वोत्कृष्ट चाट’ आता सोशल मीडिया यूजर्सनी या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, ‘काय इनोसंट स्माईल’ दुसऱ्या यूजरने कमेंट करताना लिहिले की, ‘व्हिडिओमध्ये त्याच्या चेहऱ्यावरचे स्मित सर्वात चांगले दिसत आहे’ याशिवाय बहुतेक लोकांनी इमोजी शेअर करून प्रेमाचा वर्षाव केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 2.1 मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही पाहा:

Video: हातात जाएंट कोब्रा घेऊन डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, हा हाताने जीव द्यायला निघालाय!

Video: मांजर आणि अस्वलाची लढाई, तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल? थरारक व्हिडीओ पाहा!