व्हायरल होणारी ‘कौन होता है बिहारी, तुमको पता क्या है’ ही कविता तुम्ही ऐकलीत का? ऐकाच

| Updated on: Jan 28, 2023 | 11:39 AM

एक कविता सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जी लोकांना खूप आवडत आहे. ही कविता बिहारमधील नालंदा मधील साहिल कुमार नावाच्या मुलाने म्हटली आहे. जी सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालीये.

व्हायरल होणारी ‘कौन होता है बिहारी, तुमको पता क्या है’ ही कविता तुम्ही ऐकलीत का? ऐकाच
kaun hota hai bihari
Image Credit source: Social Media
Follow us on

भारतात वेगवेगळ्या राज्याची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. ज्या त्या राज्यानुसार ज्या त्या लोकांची ओळख आहे. उदाहरणार्थ, तुम्ही जर उत्तर प्रदेशचे असाल तर ‘यूपी वाले भैया’, जर तुम्ही महाराष्ट्राचे असाल तर ‘मराठी’ आणि बिहारचे असाल तर ‘बिहारी’. मात्र, अनेकजण ‘बिहारी’ हा शब्द अपशब्द म्हणूनही वापरतात. यावर आधारित एक कविता सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जी लोकांना खूप आवडत आहे. ही कविता बिहारमधील नालंदा मधील साहिल कुमार नावाच्या मुलाने म्हटली आहे. जी सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालीये. ‘बिहारी’ हा अपशब्द नाही आणि तसे वाटत असेल तर ती तुमचीच चूक आहे, हे त्यांनी आपल्या कवितेतून सांगितले आहे.

साहिलने आपल्या कवितेचे नाव ‘जागीर’ असे ठेवले आहे. बिहारी असण्याचा अर्थ आणि राज्यातील नामवंत व्यक्ती त्यानी अत्यंत सोप्या शब्दात समजावून सांगितल्या आहेत. साहिलने आपल्या कवितेत बिहारी लोकं खरंच कसे असतात. ते स्वतः बिहारचे आहोत असं सांगत नाहीत. ते स्वतःच स्वतःला स्विकारत नाहीत असं म्हटलंय. थोडक्यात काय तर बिहारचे असणं काही पाप नाही, गैर नाही बिहारी असण्याचा अभिमान बाळगा अशा आशयाची ही कविता आहे. या कवितेला लोकांनी चांगलीच दाद दिलीये.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @USIndia_ नावाच्या आयडीसह ही शानदार कविता शेअर करण्यात आली असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘बिहारी कोण आहे, तुम्हाला माहित आहे का? साहिल कुमारची ‘जागीर’ ही कविता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दोन मिनिटे 38 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 13 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण ही कविता ‘खूप सुंदर, खूप छान’ म्हणत आहेत, तर काही जण ‘झकास’ म्हणत आहेत.