रोमँन्टिक गाण्यावर डान्स, चित्रपटालाही लाजवेल असं केतन-सियाचं प्रीवेडिंग, Video आला समोर
Ketan Sia Video : केतन अग्रवाल या तरूणाची हत्या त्याची होणारी पत्नी सिया गोयलने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केल्याचे समोर आले आहे. अशातच आता केतन आणि सियाच्या प्री वेडिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून लोहगड हत्याकांडाची संपूर्ण देशात चर्चा आहे. याबाबत दररोज नवे खुलासे होत आहेत. केतन अग्रवाल या तरूणाची हत्या त्याची होणारी पत्नी सिया गोयलने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केल्याचे समोर आले आहे. सियाला केतनशी लग्न करायचे नव्हते, त्यामुळे तिने 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरील सुमारे 400 फूट खोल दरीत केतनला ढकलून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. अशातच आता या दोघांच्या प्रीवेडिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात केतन आणि सिया हे रोमँन्टिक गाण्यावर डान्स करत असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
केतन-सिया यांच्या प्री वेडिंगचा व्हिडिओ
केतन आणि सिया यांच्या प्री वेडिंगचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात केतन आणि सिया एकमेकांसोबत बॉलिवूडच्या रोमँन्टिक गाण्यावर डान्स करत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. यात काही नातेवाईकही दिसत आहेत. तसेच नातेवाईकांकडून सियाचे त्यांच्या कुटुंबात स्वागत केले जात असल्यातेही पोस्टरमध्ये दिसत आहे. या व्हिडिओत केतन आणि सिया हे दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रोमँन्टिक गाण्यावर डान्स, चित्रपटालाही लाजवेल असं केतन-सियाचं प्रीवेडिंग, Video आला समोर #ketan #sia #lohgad pic.twitter.com/lj5XXccrUF
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 26, 2026
नोव्हेंबरमध्ये होणार होते केतन आणि सियाचे लग्न
केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा साखरपुडा काही महिन्यांपूर्वी झाला होता आणि नोव्हेंबर महिन्यात त्यांचे लग्न होणार होते. यासाठीच्या तयारीलाही सुरुवात करण्यात आली होती. लग्नापूर्वी या दोघांचे प्री-वेडिंग शूट करण्यात आले होते. तसेच या दोघांमध्ये किरकोळ वाद झाले होते अशी माहितीही समोर आली होती. मात्र 18 तारखेला सियाने चेतनच्या मदतीने केतनचा काटा काढल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली आहे. सध्या दोघांनाही 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिस तपासानुसार, सिया गोयलचे चेतन चौधरीसोबत प्रेमसंबंध होते आणि तिला त्याच्याशीच लग्न करायचे होते. याच कारणामुळे दोघांनी मिळून केतनला कायमचा मार्गातून दूर करण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. हत्येपूर्वी सिया आणि चेतन एका कॅफेमध्ये भेटले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दोघे एकत्र असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी आता विविध पुराव्यांच्या मदतीने तपासाला सुरुवात केली आहे.