निळ्या विंचूने किंग कोब्राचंही मार्केट डाऊन केलं! विषाची किंमत आहे तब्बल 75 कोटी प्रति लीटर

| Updated on: Dec 24, 2021 | 5:54 PM

जगात एकापेक्षा एक खतरनाक विषारी प्राणी असताना या विंचूच्या विषामध्ये अशी काय खास गोष्ट आहे, की त्यासाठी लोकं कोट्यवधी रुपये मोजतात? तर मंडळी हा विंचू आणि त्याचं विष हे किंग कोब्राच्या विषापेक्षाही जास्त डेंजर आहे.

1 / 5
विंचू विषारी असतो आणि बिनविषारीही असतो! पण जगात एक असा विंचू आहे, जो सर्वाधिक विषारी असून त्याच्या विषाची किंमतही सर्वाधिक आहे, हे ऐकून तुम्ही हैराण व्हाल! सर्वसामान्य विंचवापेक्षा हा विंचू असा खास का आहे? आणि त्याचं विष इतकं महाग का? याबाबत आज जाणून घेऊयात... (Photo Source: Reddit)

2 / 5
जगात एकापेक्षा एक खतरनाक विषारी प्राणी असताना या विंचूच्या विषामध्ये अशी काय खास गोष्ट आहे, की त्यासाठी लोकं कोट्यवधी रुपये मोजतात? तर मंडळी हा विंचू आणि त्याचं विष हे किंग कोब्राच्या विषापेक्षाही जास्त डेंजर आहे. जिथे लोकं किंग कोब्राच्या विषाला 30 ते 32 कोटी रुपये प्रति लीटर इतका खर्च करतात. तर या निळ्या विंचूच्या विषासाठी तब्बल 75 कोटी रुपये प्रति लीटर इतकी जबरदस्त रक्कम आकारली जाते. (Photo Source: Plotr Nascrecki/Reddit)

3 / 5
कर्करोगावर प्रभावी असणार एक महत्त्वाचं औषध या विंचवाच्या विषापासून बनवलं जातं. या औषधाचं नाव व्हिडाटॉक्स असं असून हा विंचू खासकरुन फक्त क्युबामध्ये आढळला जातो. या विंचवाच्या विषामध्ये 50 लाखाहून वेगवेगळे घटक असून त्यांचा वापर हा वेगवेगळ्या औषधांच्या निर्मितीसाठी होतो. यातील अनेक घटकांबाबत अजूनही अभ्यास सुरु असल्याचं सांगितलं जातंय. (Photo Source: Youtube Grab)

4 / 5
निळ्या विंचवाचं विष हे औषधांसाठी गुणकारी असून त्यातून पेनकिलरही तयार केले जात असल्याची माहिती इस्राईलच्या एका संशोधकांनी दिली आहे. निळ्या विंचवाच्या विषातील बहुतांश घटक कर्करोगावरील औषधांत वापरल्यामुळे ते औषध प्रभावी बनल्याचं, तेल अवीव विद्यापिठाचे प्राध्यापक मायकेल गुरेविट्झ यांनी म्हटलंय. (Photo Source: David Barkesy )

5 / 5
एखाद्या अवयवाच्या प्रत्योरपण शस्त्रक्रियेनंतही हे विष महत्त्वाची भूमिका बजावतं, असं फ्रेंच हचिंसन कॅन्सर रिसर्च सेंटरनं जारी केलेल्या एका अभ्यातून म्हटलं आहे. अवयव प्रत्यारोपणानंतर शरीर अनेकदा वेगवेगळ्या प्रकारे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेवर रिऍक्ट होतं. अनेकदा अवयवांना शरीर सामावून घेत नाही. त्यावेळी शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी निळ्या विंचवाचं विष हे महत्त्वपूर्ण भूमिका पार पडतं, असं अभ्यासकांनी सांगितलंय. (Photo Source: Flickr)