10 वर्षांची मुलगी बुडाली नदीत, मृत्यूला दिला ‘खो‘, सांगितले ‘ते’ जग कसं आहे!

Experience of untold World : लिसा ब्लिस, न्यूयॉर्क की महिला, 10 वर्षांची असताना ती बर्फाच्छादित नदीत 30 मिनिट बेशुद्ध पडलेली होती. त्यावेळी तिने आत्म्याचा प्रवासाचा अनुभव सांगितला. तिच्यावर दाव्यावर संशोधन पण झाले, काय आहे तिचा अनुभव?

10 वर्षांची मुलगी बुडाली नदीत, मृत्यूला दिला खो‘, सांगितले ते’ जग कसं आहे!
मृत्यूनंतरचे ते जग कसं आहे
Image Credit source: गुगल
| Updated on: May 31, 2025 | 4:44 PM

A Journey of the Soul : मेल्यानंतर काय होते? याचे उत्तर शोधण्याचे प्रयत्न सुरूच आहे. अनेक धर्मग्रंथा याविषयीचा दावा करण्यात आला. तर विज्ञान आणि वैज्ञानिकांना सुद्धा पुनर्जन्माच्या काही घटनांनी चक्रावून टाकले आहे. अनेक लोक मृत्यूला खो देऊन परत आले आहे. त्यांनी त्याविषयीचे अनुभव कथन केले आहे. भारतातही अशा घटना घडल्या आहेत. त्यावर संशोधन पण झाले आहे. त्याविषयीचे किस्से वृत्तपत्रात छापून आले आहेत. त्याचा तपशील आणि पडताळा पण झालेला आहे. तरीही मृत्यूनंतरचे गूढ जग मानवाच्या मनाला, बुद्धीला सातत्याने आव्हान देत आहे. अमेरिकेतील लिसा ब्लिस यांचा असाच एक अनुभव आहे. त्या न्यूयॉर्क शहरात राहणाऱ्या आहेत.

काय सांगितला अनुभव

लिसा ब्लिस, या न्यूयॉर्कमध्ये राहतात. त्या जेव्हा 10 वर्षांच्या होत्या. तेव्हा त्यांच्यासोबत एक भयंकर घटना घडली. त्या एका बर्फाच्छादित नदीत बुडल्या. त्यावेळी त्या 10 वर्षांच्या होत्या. त्या जवळपास 30 मिनिटं बेशुद्ध होत्या. त्यावेळी त्यांचा आत्मा शरीराला पाहत होता. त्यांचे शरीर नदीच्या पात्रात कलंडलेले होते. तर त्यांचा आत्मा एका सुंदर फुलांच्या रस्त्यावरून चालत होता. ती फुलं अत्यंत आकर्षक आणि गडद रंगाची होती. ती मनाला तजेला आणि अपार शांती देत होती. ती चालत होती. त्यावेळी तिला एक भव्य असं दार दिसलं. त्याविषयी तिने कुठंतरी वाचलेले होतं. बहुधा चर्चेमध्ये तिने ते ऐकलं असावं, असं तिला आठवतं.

दरवाज्याजवळ एक अनोळखी व्यक्ती

तिला त्या दरवाज्याजवळ एक अनोळखी व्यक्ती दिसली. पण तिने जवळ जात पाहिले असता तो तर देव होता. त्याचा चेहरा तिला नीट आठवत नाही. पण त्याच्यामुळे तिला शांत आणि सुरक्षित वाटू लागले. ती दरवाजा हात लावणार तोच तिला कोणी तरी झटक्यात मागे खेचल्याचे तिला जाणवले. तो फुलांचा सुंदर रस्ता अवघ्या क्षणात डोळ्यादेखत झर्रकन गायब झाला आणि ती तिच्या शरीरात परत आली. तिला आता अस्वस्थ वाटू लागले.

Lissa Bliss

चुलत बहिणीमुळे तिला जाग

लिसा या नदीच्या काठावर होत्या. तिची बहिणी तिच्या पोटातील पाणी बाहेर काढण्याचा आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. थंड पाण्यात राहिल्याने तिच्या मज्जासंस्था अथवा इतर अवयवांना कुठलाही अपाय झाला नाही. ती जागी झाल्यावर तिला शरीर जड जड वाटू लागले. तिला जी अपार शांतता मिळाली होती, ती कुठंतरी दूर गेल्याची रूखरूख तिला सतत जाणवते. तिने ही घटना घरच्यांना सांगितली. सर्वांनी तिची काळजी घेतली.

या अनुभवानंतर ती मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करू लागली. तिने हेच तिचे करिअरचे क्षेत्र निवडले. तिने तो अनुभव पुन्हा ताजा करण्याचा पण प्रयत्न केला. याविषयी संशोधन पण करण्यात आले. ज्या लोकांसोबत असे काही घडलेले आहे, त्यांच्याशी संपर्क करून ती त्यांची मनोवैज्ञानिक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.