
अपघात कधी कुठे कसा होईल याचा काही नेम नसतो. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला घामही फुटू शकतो. काही सेकंदांचा हा ट्रेंडिंग व्हिडिओ खरंच धोकादायक आहे. रिपोर्टिंग करणारी व्यक्ती सांगत आहे की, ज्या रस्त्यावर तो उभा आहे, त्या रस्त्यावर अपघात होत राहतात. असं सांगत असतानाच त्याच्या मागे त्याच रस्त्यावर अपघात घडतो. हाच व्हिडीओ व्हायरल झालाय.
या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती माइक पकडून रिपोर्टिंग करताना दिसत आहे. काही क्षणानंतर इथे काय होणार आहे, याची कुणालाही कल्पना नसेल.
हा रस्ता लॉस एंजेलिसमधील सर्वात धोकादायक रस्ता असल्याचे या रिपोर्टरचे म्हणणे आहे. सर्वात आधी सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहा…
LA News crew does a story about the most dangerous intersection in the area and witnesses an accident live.
Then it turns into a hit and run.
?sound …? pic.twitter.com/eI8r5Aldse
— Wall Street Silver (@WallStreetSilv) October 31, 2022
रिपोर्टरने रस्ता धोकादायक असल्याचे वर्णन करताच, त्याच्या मागे अचानक दोन वाहने धडकण्याच्या मार्गावर असतात. हा रस्त्यावरील अपघात टळलाय. हे दृश्य पाहून रिपोर्टिंग करणाऱ्या व्यक्तीला धक्का बसतो.
यातील एक गाडी थांबते आणि दुसरी गाडी पाहिजे त्या मार्गाने चालत राहते. व्हिडिओ पाहून अनेक जण प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत.
हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी (सोशल मीडिया यूजर्स) पाहिला आहे. इतकंच नाही तर अनेकांनी हा अवघ्या 19 सेकंदांचा व्हिडिओ लाईकही केला आहे.
कमेंट सेक्शनमध्येही लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले. या व्हिडिओमुळे लोकही खूप घाबरले आहेत.