Viral : थंडीपासून वाचण्यासाठी अवलियानं केलाय अजब जुगाड, VIDEO पाहून हसतच राहाल

| Updated on: Jan 13, 2022 | 10:49 AM

एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल (Viral) होतोय, यामध्ये एक व्यक्ती मोठ्या तलावात किंवा नदीत अंघोळ करत आहे, परंतू त्यानं थंडीपासून वाचण्यासाठी जे जुगाड केलंय, ते मात्र अप्रतिम आहे.

Viral : थंडीपासून वाचण्यासाठी अवलियानं केलाय अजब जुगाड, VIDEO पाहून हसतच राहाल
थंडीपासून वाचण्यासाठी केलं देशी जुगाड
Follow us on

थंड वातावरणात आंघोळ (Bath) करणं किती अवघड असतं, आपल्या सर्वांनाच माहीत आहे. लोक उन्हाळ्यात दिवसातून दोन-तीन वेळा आंघोळ करतात, तर थंडीत एकदाही अंघोळ जड वाटते. असे अनेक लोक आहेत जे अनेक दिवस अंघोळ करत नाहीत. थंडीत अंघोळ करून काय करायचं, असं अनेकजण म्हणताना तुम्ही ऐकलं असेल. खरं तर एखाद्याला थंडी असते आणि वरून थंड पाण्यानं आंघोळ करावी लागली तर अवघड जाते, पण जरा कल्पना करा, की या थंडीत कोणी उघड्यावर म्हणजे तलावात किंवा नदीत आंघोळ केली तर? हे ऐकून हसू येईल, आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल (Viral) होतोय, यामध्ये एक व्यक्ती मोठ्या तलावात किंवा नदीत अंघोळ करत आहे, परंतू त्यानं थंडीपासून वाचण्यासाठी जे जुगाड केलंय, ते मात्र अप्रतिम आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसून हसायला येईल.

विचित्र जुगाड

भारतीय लोक जुगाड करण्यात माहीर आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीत जुगाड दिसतो आणि काही जुगाड खूप विचित्र असतात. असाच एक अजब जुगाड व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती पाण्यात आंघोळ करत आहे आणि त्याच्यासमोर कढईसारखं काहीतरी पेटलेलं आहे. आंघोळ करतानाही तो मध्येच विस्तव पेटवत राहतो. तो पाण्यात डुंबतो ​​आणि बाहेर येताच त्याचा थरकाप निघून जातो आणि तो पटकन शेकायला लागतो.

ट्विटर हँडलवर शेअर

हा मजेदार व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलंय, माझा भारत महान आहे… आशादायक भारत’. यासोबतच ‘इतके हुशार लोक फक्त भारतातच का जन्माला येतात?’, असं व्हिडिओमध्ये लिहिलं आहे. अवघ्या 15 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलं आहे.

‘जुगाडमध्ये भारतीयांना कोणीही हरवू शकत नाही’

व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूझरनं ‘अखंड ग्यानी’ असं लिहिलं आहे, तर दुसऱ्या यूझरनं ‘जुगाडमध्ये भारतीयांना कोणीही हरवू शकत नाही’ अशी कमेंट केलीय. त्याचप्रमाणे आणखी एका यूझरनं लिहिलंय, की ‘आवश्यकता ही शोधाची जननी आहे’.

अनोळखी व्यक्तीच्या घरी डिनरला गेली महिला, लॉकडाऊन लागला आणि मग…

Video : फाळणीनं तोडलं… नियतीनं जोडलं! 74 वर्षांपूर्वी विभक्त झालेल्या भावांची गळाभेट म्हणूनच ऐतिहासिक आहे

VIDEO : शिक्षकाचा ‘असा’ निरोप समारंभ पाहिलाय? ढसाढसा रडले विद्यार्थी आणि सहकारीही…