अनोळखी व्यक्तीच्या घरी डिनरला गेली महिला, लॉकडाऊन लागला आणि मग…

चीनमधील झेंगझौ या शहरात ही घटना घडली आहे. वांग नावाची एक महिला मागील बुधवारी एका अनोळखीय व्यक्तीच्या घरी भेटण्यासाठी गेली होती. तेव्हाच बातमी आली की शहरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ती महिला त्या अनोळखी व्यक्तीच्या घरी फसली.

अनोळखी व्यक्तीच्या घरी डिनरला गेली महिला, लॉकडाऊन लागला आणि मग...

नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भाव (Corona Outbreak) आणि त्यामुळे आलेल्या लॉकडाऊनच्या (Lockdown) स्थितीमुळे अनेकांचं आयुष्य बदललं. अनेकांनी जवळच्या लोकांना गमावलं, तर अनेकांना नवी माणसं मिळाली. तर अनेकांसोबत काही विचित्र आणि चांगल्या घटनाही घडल्या. असाच एक प्रकार चीनमध्ये पाहायला मिळाला. त्याचं झालं असं की एक महिला एका अनोळखी व्यक्तीसोबत पहिल्यांदाच त्याच्या घरी डेटवर (dating) गेली होती. मात्र, तेव्हाच तिथे लॉकडाऊन लागतो. त्यामुळे त्या महिलेला त्या अनोळखी व्यक्तीसोबत दिवस घालवावे लागतात.

चीनमधील झेंगझौ या शहरात ही घटना घडली आहे. वांग नावाची एक महिला मागील बुधवारी एका अनोळखीय व्यक्तीच्या घरी भेटण्यासाठी गेली होती. तेव्हाच बातमी आली की शहरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ती महिला त्या अनोळखी व्यक्तीच्या घरी फसली. वांगने मंगळवारी शांघायमधील ‘द पेपर’ला दिलेल्या माहितीनुसार जेव्हा ती झेंगझौमध्ये पोहोचली. तेव्हा अचाकन तिथे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यावेळी कुणालाही कुठेही जाण्याची मुभा नव्हती, त्यामुळे वांगला त्या अनोळखी व्यक्तीच्या घरी राहण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

मुलगा पाहण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली आणि अडकून पडली!

वांगने सांगितलं की तिच्या लग्नासाठी तिचे कुटुंबीय मुलांच्या शोधात आहेत. त्यांनी वांगसाठी आतापर्यंत 10 मुलं पाहिली आहेत. त्यातील एका मुलाला भेटण्यासाठीच ती झेंगझौ शहरात आली होती. त्या मुलाने आपलं कुकिंग स्किल दाखवण्यासाठी तिला घरी निमंत्रित केलं होतं. त्या मुलाच्या निमंत्रणानंतर वांग त्याच्या घरी पोहोचली आणि त्यावेळी लॉकडाऊनची घोषणा झाली!

लॉकडाऊनच्या घोषणेमुळे वांगला त्या मुलाच्या घरी राहणं भाग पडलं. वांगने या दिवसांत काही छोटे-छोटे व्हिडीओ बनवले आहेत. त्यात ती दाखवते की तो मुलगा तिच्यासाठी जेवण बनवत आहे. घरातील काम करतो आणि जेव्हा वांग विश्रांती घेते तेव्हा तो मुलगा आपल्या लॅपटॉपवर ऑफिसचं काम करतो.

आणि तो मुलगा वांगला भावला!

वांगने सांगितलं की तिला लग्नासाठी एक असा पार्टनर हवा आहे जो तिच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी करु शकतो. पण हा मुलगा खूप कमी बोलतो. पण त्याच्या अन्य सगळ्या बाबी चांगल्या आहेत. तो मुलगा जेवण ठीकठाक बनवत असेल. पण त्याला जेवण बनवण्याची आवड आहे. त्याची हीच बाबत आपल्याला भावल्याचं वांग सांगते.

वांगने हा व्हिडीओ ट्विटरवरही शेअर केलाय. हा व्हिडीओ 60 लाखापेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. दरम्यान, वांगने हा व्हिडीओ काही कारणास्तव हटवला आहे. तिने सांगितलं की, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्या मुलाचे मित्र त्याला सारखा फोन करु लागले. त्यामुळे त्याच्या खासगी आयुष्यावर परिणाम होऊ लागला.

इतर बातम्या :

Video : फाळणीनं तोडलं… नियतीनं जोडलं! 74 वर्षांपूर्वी विभक्त झालेल्या भावांची गळाभेट म्हणूनच ऐतिहासिक आहे

Video | दारु पिऊन उलटे फिरले तारे! गाडी रिव्हर्समध्ये टाकून ठोकली, चालकाचं नाव सुभाष वाघमारे

Published On - 9:59 pm, Wed, 12 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI