Video | दारु पिऊन उलटे फिरले तारे! गाडी रिव्हर्समध्ये टाकून ठोकली, चालकाचं नाव सुभाष वाघमारे

Car Accident : दारुच्या नशेत असलेल्या एका चालकानं आपली अल्टो कार रिव्हर्स गिअरमध्ये टाकली. यानंतर कारचालकानं एक्सलरेटर इतक्या जोरात दाबला की जणू काही तो एक्सलरेटवर उभाच राहिला असावा!

Video | दारु पिऊन उलटे फिरले तारे! गाडी रिव्हर्समध्ये टाकून ठोकली, चालकाचं नाव सुभाष वाघमारे
पिंपरीत भीषण अपघात

पिंपरी : अपघात (Road Accident) कुठे कधी कसा होईल, हे कुणीच सांगू शकत नाही. कुणाची चूक कुणाच्या जीवावर उठू शकते, हे देखील अपघातबाबत सांगणं, बोलणं कठीणच. अचानक कोणती गाडी कुठून येईल? कुणाला धडक देईल? कुणाचा जीव घेईल? याचा काहीही नेमक नाही. एक धक्कादायक घटना समोर आली आहे पिंपरीतून (Pimpari). पिंपरी चिंचवडमध्ये असाच एक भयंकर अपघात घडला असून हा अपघात एक नव्हे तर दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या अपघातामध्ये तीन ते चार जणांना एका खासगी वाहनानं चिरडलंय. दारुच्या नशेत रिव्हर्स गिअरमध्ये गाडी बेदरकारपणे पळवणाऱ्याविरोधात पोलिसांनी गुन्हादेखील नोंद केला आहे. या अपघाताची तीव्रता किती भयंकर होती, याची कल्पना लोकांना या अपघाताचा व्हिडीओ (CCTV Video of Accident) पाहून आली आहे.

नेमका कुठे झाला अपघात?

हा भीषण अपघात घडला पिंपरी चिंचवडच्या म्हतोबा नगर परिसरामध्ये. स्थानिक दुकानांमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद धाली आहे. दारुच्या नशेत असलेल्या एका चालकानं आपली अल्टो कार रिव्हर्स गिअरमध्ये टाकली. यानंतर कारचालकानं एक्सलरेटर इतक्या जोरात दाबला की जणू काही तो एक्सलरेटवर उभाच राहिला असावा! यामुळे रिव्हर्स गिअरमध्ये गाडी वाटेत येईल, त्याला चिरडत निघाली होती.

सुभाष वाघमारे असं या कारचालकाचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिस सध्या याप्रकरणी सुभाष वाघमारे यांची चौकशी करत आहेत. दारु पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसंच लोकांचा जीव धोक्यात घातल्यामुळे आता त्यांच्यावर गुन्हादेखील नोंदवून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

जवळपास तीन ते चार नागरिकांसह स्थानिक मालमत्तेचंही या अपघातात प्रचंड नुकसान झालं आहे. सुदैवानं या अपघातात कुणाचाही जीव गेला नाही. मात्र जेव्हा ही घटना घडली त्यावेळी उपस्थित असलेल्यांनी याची देही याचि डोळा मृत्यू आपल्या डोळ्यांदेखल पाहिला असणार, हे नक्की!

पाहा व्हिडीओ –

संबंधित बातम्या :

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबला, कारने तरुणाला चिरडलं

CCTV VIDEO | पुण्यात डम्परखाली चिरडून दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Published On - 9:19 pm, Wed, 12 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI