AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | घोड्यावर उभे राहत पैसे उधळले, पण मध्येच घोळ झाला, नवरदेवासह माणसाची चांगलीच फजिती, व्हिडीओ व्हायरल

सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ अतिशय विशेष आहे. या व्हिडीओमध्ये एका लग्नाच्या वरातीमध्ये एका माणसाची चांगलीच फजिती उडाली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत.

Video | घोड्यावर उभे राहत पैसे उधळले, पण मध्येच घोळ झाला, नवरदेवासह माणसाची चांगलीच फजिती, व्हिडीओ व्हायरल
marriage viral video
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 08, 2021 | 7:38 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला एकापेक्षा एक व्हिडीओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ तर अतिशय मजेदार असे असतात. काही व्हिडीओंना पाहून आपण खळखळून हसायला लागतो. सध्या चर्चेत आलेला व्हिडीओ अतिशय विशेष आहे. या व्हिडीओमध्ये लग्नाच्या वरातीमध्ये एका माणसाची चांगलीच फजिती उडाली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत.

रुबाबदार नवरदेव घोड्यावर बसला

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. यामध्ये नवरदेवाची वरात निघाली असल्याचे दिसतेय. नवरदेवाचे काही नातेवाईक आनंदात नाचत आहेत. शाही साज चढवलेला नवरदेव थाटात घोड्यावर बसला आहे. मात्र मध्येच एका माणसाने  घोळ केला आहे.

दुसरा माणूस घोड्यावर चढला, पण मोठा घोळ झाला

सगळे आनंदात नाचत असताना एका माणसाने मात्र मोठा घोळ केला आहे. नवरदेव ज्या घोड्यावर बसलेला आहे, त्यावर हा माणूस अचानकपणे चढलाय. नवरदेवाच्या पाठीमागे उभं राहून तो खिशातील पैसे काढत आहे. तसेच आपल्या नवरदेवावर तो आनंदात पैसे उधळतोय. मात्र नवरदेवाच्या मागे उभं राहून पैसे उधळणं घोड्याला आवडलं नसावं. कदाचित याच कारणामुळे घोड्याने माणसाला खाली फेकून दिल्याचं दिसतंय. माणसाचा घोड्यावरुन तोल गेला आहे. थेट खाली पडत असल्यामुळे माणूस चांगलाच घाबरलाय. विशेष म्हणजे खाली कोसळत असताना माणसाने नवरदेवालासुद्धा गच्च पकडले आहे. मागून गच्च पकडल्यामुळे नवरदेवसुद्धा खाली कोसळला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

पैसे उधळणे नवरदे तसेच नवरदेवाच्या नातेवाईकाला चांगलेच महागात पडले आहे. हा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत. तसेच काही नेटकरी या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र सध्या त्याला इन्स्टाग्रामवर horse_of_kathiyawad1 या अकाऊंटवर पाहता येईल.

इतर बातम्या :

Video | नाद करायचा नाय ! चेन्नईच्या पठ्ठ्याने चालवली दोन चाकांवर रिक्षा, भलेभले स्टंटबाज गप्प, व्हिडीओ व्हायरल

Video | 14 फुटाच्या सापासोबत खेळ, गळ्यात घालून गावभर फिरणं महागात, क्षणात जीव गेला, नेमकं काय घडलं ?

Video: कंगव्याच्या आत भरला कॅचअप, नवऱ्याच्या प्रँकमुळे बायको चवताळली, व्हिडीओ तुफान व्हायरल

(man climb on horse of groom marriage function video went viral on social video)

Follow Us
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन