AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या तिकीटावर 25 कोटींची लॉटरी जिंकली तेच तिकीट हरवलं…पुढे जे झालं ती जणू फिल्म कहाणी!

लॉटरीच्या तिकिटाची एक अतिशय फिल्मी कहाणी समोर आलीये. यामध्ये एका कार मेकॅनिकने 25 कोटींची लॉटरी जिंकली, मात्र या लॉटरीचे पैसे मिळण्याआधीच मोठा गदारोळ झाला. झालं असं की, यावर्षी जानेवारी महिन्यात या मेकॅनिकने लॉटरीची तिकिटे विकत घेतली.

ज्या तिकीटावर 25 कोटींची लॉटरी जिंकली तेच तिकीट हरवलं...पुढे जे झालं ती जणू फिल्म कहाणी!
Lottery ticket lost
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 04, 2023 | 12:14 PM
Share

मुंबई: लॉटरीचे तिकीट जाहीर होताच लोक एका झटक्यात कोट्यधीश बनतात. पण अमेरिकेतील लॉटरीच्या तिकिटाची एक अतिशय फिल्मी कहाणी समोर आलीये. यामध्ये एका कार मेकॅनिकने 25 कोटींची लॉटरी जिंकली, मात्र या लॉटरीचे पैसे मिळण्याआधीच मोठा गदारोळ झाला. झालं असं की, यावर्षी जानेवारी महिन्यात या मेकॅनिकने लॉटरीची तिकिटे विकत घेतली.

पॉल लिटिल असे या मेकॅनिकचे नाव असून तो अमेरिकेतील मॅसेच्युसेट्सचा रहिवासी आहे. त्याने जानेवारीत तिकीट विकत घेतले होते, पण त्याचं भांडण झालं होतं. तिकीट काढून तो घरी परतत होता आणि वाटेत दारूच्या दुकानातच तो तिकीट विसरला होता. त्याचे तिकीट दारूच्या दुकानात राहिलंय याची त्याला जराही कल्पना नव्हती. विसरलेले तिकीट बघून दारूच्या दुकानात काम करणाऱ्या एका महिलेने हे तिकीट खिशात ठेवले.

नुकतेच या तिकिटाचा जॅकपॉट समोर आला असता मेकॅनिकने खरेदी केलेल्या तिकिटाची संख्या 25 कोटी रुपये मिळाल्याचे निदर्शनास आले. दुसरीकडे त्याचे नाव जाहीर करण्यात आले आणि येथे तिकिटाचा शोध घेतला असता तो सापडला नाही. दारूच्या दुकानात तिकीट टाकल्याचं त्याला आठवलं आणि तो तिथेच विसरला. त्याने तिथे धाव घेतली, पण त्या महिलेने तसे काहीही घडले नसल्याचे सांगितले.

गंमत म्हणजे या महिलेने स्वत: लॉटरी ऑफिसमध्ये जाऊन हे 25 कोटी घेण्याचा प्रयत्न केला. महिलेने लॉटरी कार्यालयातील अधिकाऱ्यांना तिकीट दाखवले. जशी ती महिला तिकीट दाखवायला गेली त्या महिलेवर संशय आला, तिची चौकशी करण्यात आली. शेवटी तिकीट विकत घेणाऱ्या पॉल लिटिलचा शोध लागला आणि त्याला लॉटरीचे पैसे देण्यात आले. या महिलेवर फसवणुकीचा आरोप करून तुरुंगात डांबण्यात आले.

आणखी एका मीडिया रिपोर्टनुसार, या प्रकरणाची सुनावणी सुरू असून पॉल लिटिल नावाच्या मेकॅनिकला हे पैसे मिळाले आहेत. तसेच तो अत्यंत गरीब मेकॅनिक असल्याचेही सांगण्यात आले. सध्या तो आपल्या कुटुंबासोबत खूप आनंदी आहे.

Follow Us
ती समजून घेण्याची गोष्ट... एकनाथ शिंदेच्या दालनातील पवरांच्या बैठकीबात
ती समजून घेण्याची गोष्ट... एकनाथ शिंदेच्या दालनातील पवरांच्या बैठकीबात जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया
थेट विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह! पवार-शिंदे भेटीवर बोलताना संजय राऊत
थेट विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह! पवार-शिंदे भेटीवर बोलताना संजय राऊत हे काय बोलून गेले?
भाजप नगरसेवकाकडून मुख्याधिकाऱ्यालाच मारहाण; पाणीपुरवठ्याच्या वादाचं..
Raigad | पाणीपुरवठ्याच्या वादाचं हिंसक रूप!; भाजप नगरसेवकाकडून मुख्याधिकाऱ्यालाच मारहाण
ही एका प्रकारे आणीबाणीच”; संजय राऊतांची थेट मुख्यमंत्र्यांवर टीका,
ही एका प्रकारे आणीबाणीच”; संजय राऊतांची थेट मुख्यमंत्र्यांवर टीका, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
मोशी इमारत दुर्घटनेत मोठी अपडेट; 9 जणांची सुटका; ढिगाऱ्याखाली अजूनही..
मोशी इमारत दुर्घटनेत मोठी अपडेट; 9 जणांची सुटका; ढिगाऱ्याखाली अजूनही 8 जण अडकल्याची भीती
मध्यरात्री मराठवाडा हादरला! हिंगोलीत 4.4 रिश्टरचा भूकंप; तर नांदेड...
Hingoli | मध्यरात्री मराठवाडा हादरला! हिंगोलीत 4.4 रिश्टरचा भूकंप; तर नांदेड, परभणी, लातूरमध्येही....
5 दिवसांनंतर विरार लोकल धावली... पण स्टेशन गाठण्यासाठी अजूनही...
5 दिवसांनंतर विरार लोकल धावली... पण स्टेशन गाठण्यासाठी अजूनही पाण्यातूनच प्रवास!
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच...
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच... पहा व्हिडीओ
ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
Video | ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक,
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक, रोहित पवार अनुपस्थित तर...नेमकं काय घडलं?