AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | इंजेक्शन घेणार नाही म्हणत आजोबा पळाले, नंतर नर्सने जे केलं ते एकदा बघाच !

एक अतिशय मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये इंजेक्शन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका आजोबांची झालेली फजिती दाखवण्यात आलेली आहे.

Video | इंजेक्शन घेणार नाही म्हणत आजोबा पळाले, नंतर नर्सने जे केलं ते एकदा बघाच !
| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 6:54 PM
Share

मुंबई : कोरोना महामारीला थोपवायचे असेल तर लस घेणे गरजेचे आहे. सरकार तसेच इतर खासगी संस्था कोरोना प्रतिंबधात्मक लस घेण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, एवढे सारे करुनही लोक कोरोना लस घेणे टाळत आहेत. या पार्श्वभूमीवर एक अतिशय मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये इंजेक्शन घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका आजोबांची झालेली फजिती दाखवण्यात आलेली आहे. (man refusing to take injection see viral video corona virus)

इंजेक्शन घेण्यास आजोबांची टाळाटाळ

या व्हिडीओमध्ये एक आजारी काका दिसत आहेत. रुग्णालयातील एका बेडवर ते आराम करत आहेत. बेडवर आराम करत असताना त्यांच्याकडे एक नर्स आली आहे. ही नर्स आजोबांना भले मोठे इंजेक्शन टोचण्याचा प्रयत्न करतेय. नर्सच्या हातातील इंजेक्शन पाहून आजोबा चांगलेच वैतागले आहेत. ते इंजेक्शन घेण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यांनी नर्ससोबत हुज्जतसुद्धा घातल्याचे दिसतेय. नंतर वैतागून ते बेडवर उठून बाहेर जाण्यासाठी निघाले आहेत. डॉक्टरला आवाज देत ते रुमच्या बाहेर पडत आहेत.

आजोबा रागावले अन् भलतंच झालं

आजोबा तावातावाने बाहेर जात असताना ते दरवाजाजवळ पोहोचले आहेत. तसेच दरवाजा उघडणार तोच मागे उभ्या असलेल्या नर्सने त्यांच्या दिशेने तिच्या हातातील इंजेक्शन भिरकावले आहे. इंजेक्शन फेकल्यानंतर ते थेट काकांच्या कंबरेत घुसले आहे. नंतर काकांनी ओरडून नर्सकडे आपला चेहरा केला आहे. तोच मागून डॉक्टरने दरवाजा उघडल्यामुळे कंबरेत घुसलेल्या इंजेक्शनवर दाब पडला आहे आणि ते इंजेक्शन काकांच्या कंबरेत पूर्णपणे रिकामे झाले आहे. इंजेक्शन घेण्याची इच्छा नसतानाही अशा प्रकारे इंजेक्शन टोचल्यामुळे काका अतिशय वैतागले आहेत.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत. या व्हिडीओला आयपीएस ऑफिसर रुपीन शर्मा यांनी ट्विट केले असून लोक या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स करत आहेत.

इतर बातम्या :

Video | बेशुद्ध अवस्थेत खाली पडला, नंतर अचानकपणे लागला नाचायला, हा अजब गजब व्हिडीओ एकदा पाहाच

Video | नवरीला भर मंडपात उचललं, पुन्हा पुन्हा किस करण्याचा प्रयत्न, नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल

Video | हत्तीच्या पिलाची पाण्यात मस्ती, हत्तीणीची ‘ही’ कृती पाहून नेटकरी खुश, पाहा व्हायरल व्हिडीओ

(man refusing to take injection see viral video corona virus)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...