Video | बेशुद्ध अवस्थेत खाली पडला, नंतर अचानकपणे लागला नाचायला, हा अजब गजब व्हिडीओ एकदा पाहाच

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: prajwal dhage

Updated on: Jun 21, 2021 | 5:37 PM

ही व्हिडीओंमध्ये दाखवलेलं एक असतं आणि प्रत्यक्षात घडतं दुसरंच. याच कारणामुळे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या चर्चेत येणार व्हिडीओसुद्धा असाच मजेदार आहे.

Video | बेशुद्ध अवस्थेत खाली पडला, नंतर अचानकपणे लागला नाचायला, हा अजब गजब व्हिडीओ एकदा पाहाच
dancing video

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओंमध्ये दाखवलेलं एक असतं आणि प्रत्यक्षात घडतं दुसरंच. याच कारणामुळे हे व्हिडीओ नंतर व्हायरल होत असतात. सध्या चर्चेत येणार व्हिडीओसुद्धा असाच मजेदार आहे. (Unconscious man suddenly woke up and started dancing video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ अगदीच मजेदार आहे. हा व्हिडीओ एका समारंभातील आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस जमीनीवर दोन्ही हात लांब करुन पडलेला आहे. जमिनीवर पडल्यानंतर कसलाही प्रतिसाद देत नसल्यामुळे तो बेशुद्धावस्थेत असल्यासारखे वाटत आहे. हा माणूस पडल्याचे समजताच त्याच्याजवळ दुसरा एक माणूस आला आहे. हा माणूस खाली पडलेल्या माणसाला उठवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, खाली झोपलेला माणूस कसलाही प्रतिसाद देत नाहीये.

बेशुद्ध पडलेला माणूस लगेच जागी झाला

नंतर खाली पडलेल्या माणसाजवळ उभा असलेला माणूस त्याच्या छातीवर जोरजोरात दाबतो आहे. छातीवर दाबून तो खाली पडलेल्या माणसाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसतेय. या व्हिडीओमध्ये एक गीत सुरु असल्याचेसुद्धा दिसत आहे. छातीवर दाबत राहील्यानंतर खाली पडलेला माणूस अचानकपणे जागी झाला आहे. मात्र, जाग आल्यानंतर हा माणूस कसलाही आराम न करता खाली पडलेल्या ठिकाणीच नाचतो आहे. खाली पडून तो अतिशय चांगल्या प्रकारे आपली कंबर हालवतो आहे.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by hepgul5 (@hepgul5)

नेटकरी चक्रावले, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. नेटकरी खाली पडलेल्या माणसाचे डान्सचे वेड पाहून च्रकावले आहे. व्हिडीओमध्ये सुरुवतीला खाली पडलेल्या माणसाचा मृत्यू होतो की काय असे आपल्याला वाटते. मात्र, तसे काहीही न होता तो माणूस अचानकपणे डान्स करतो आहे. हा सगळा नजारा पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून मजेदार कमेंट्स केल्या आहेत. तसेच या व्हिडीओला लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | नवरीला भर मंडपात उचललं, पुन्हा पुन्हा किस करण्याचा प्रयत्न, नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल

Video | हत्तीच्या पिलाची पाण्यात मस्ती, हत्तीणीची ‘ही’ कृती पाहून नेटकरी खुश, पाहा व्हायरल व्हिडीओ

Video : काहीही हं! थेट बैलगाडीवरून लग्नाची वरात; ‘हा’ व्हायरल व्हिडीओ पाहाच!

(Unconscious man suddenly woke up and started dancing video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI