बघता बघता सगळंच पाण्याने धुतलं, दुसरी गोपी बहु!

'साथ निभाना साथिया' ही मालिका तुम्ही पाहिली असेलच, ज्यात गोपी बहूची भूमिका साकारली होती, जी एक साधी आणि सुसंस्कृत सून आहे.

बघता बघता सगळंच पाण्याने धुतलं, दुसरी गोपी बहु!
Man washing laptop tv
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 18, 2022 | 5:47 PM

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीये. घरांपासून दुकानांपर्यंतची स्वच्छता वगैरे सुरू आहे. आत्ताची वेळ म्हणजे घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करायची. काही वेळा या स्वच्छतेच्या प्रक्रियेत लोक घरातील अशा काही गोष्टींवरही पाणी मारतात, ज्या गोष्टीवर पाणी टाळणं गरजेचे आहे. अशा गोष्टींमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू येतात. पण तुम्ही कधी कोणी मुद्दाम अशा गोष्टी पाण्याने धुताना पाहिलं आहे का? होय, असाच एक व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही हसाल.

‘साथ निभाना साथिया’ ही मालिका तुम्ही पाहिली असेलच, ज्यात गोपी बहूची भूमिका साकारली होती, जी एक साधी आणि सुसंस्कृत सून आहे.

एका सीनमध्ये तिने लॅपटॉप पाण्याने धुतला होता, त्यानंतर सोशल मीडियावर या सीनबद्दल खूप मिम्स बनवले गेले आणि आजही बनवले जातात.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच काहीसा आहे. यातही एक व्यक्ती दिवाळीसाठी अशा प्रकारे साफसफाई करतो की टीव्हीही पाण्याने धुतो.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा माणूस कसा घासून कम्प्युटर स्क्रीन आणि टीव्ही पाण्याने धुतोय, तर दुसरा एक व्यक्ती त्याचा संपूर्ण मजेशीर अभिनय कॅमेऱ्यात कैद करतो. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @tahirsh778866 नावाच्या आयडीसह हा मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये मजेशीर पद्धतीने लिहिले आहे की, ‘बंदा फ्री आहे…. कोणत्याही सणाला साफसफाई करायची असेल तर सांगा. ह्याचा यायचा जायचा खर्चही तुमचा मित्रही पैसे देईल