मराठी राजभाषा दिन : “माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा…” अशा द्या तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा

२७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन, मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा आनंद आणि तिच्या संवर्धनाचा दिवस आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर, हा दिवस कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. या दिवशी विविध कार्यक्रम, शुभेच्छा आणि मराठी भाषेच्या महत्त्वाचे स्मरण केले जाते.

मराठी राजभाषा दिन : माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा... अशा द्या तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा
Marathi RajBhasha Din 2025
| Updated on: Feb 27, 2025 | 7:15 AM

आज मराठी राजभाषा दिन. काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. दरवर्षी २७ फेब्रवारी हा दिवस राज्यात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्य सरकार, विविध सामाजिक, खासगी संस्था तसेच राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी विविध कार्यक्रम आखले जातात. मराठी राजभाषा दिनानिमित्त आपण एकमेकांना शुभेच्छा देत असतो. तुम्हालाही जर तुमच्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना किंवा तुमच्या ग्रुपमध्ये शुभेच्छा द्यायची असतील तर तुम्ही ‘या’ शुभेच्छा वाचा, स्टेटस ठेवा आणि एकमेकांना पाठवा.

मराठी राजभाषा दिनानिमित्त काही निवडक शुभेच्छा

🎯“माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!”

🎯“माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळवीन।।”

🎯“मराठी माझी जात! मराठी माझा धर्म!
मराठी माझी माती! मराठी माझं रक्त!
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

🎯“रुजवू मराठी, फुलवू मराठी
चला बोलू फक्त मराठी मराठी
भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

🎯“मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम,
मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी,
आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठी ला माय मानणाऱ्या
सर्व मराठी बांधवाना…
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

🎯“माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

🎯“अंगणात तुळस आणि शिखरावर कळस,
हिच आहे मराठी महाराष्ट्राची ओळख,
कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर,
हिच आहे सौभाग्याची ओळख,
माणसात जपतो माणुसकी, आणि नात्यात जपतो नाती,
हिच आमची ओळख,
माय मानतो मराठी,गर्व आहे मराठी असल्याचा
मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा”

🎯“माझ्या मराठीची कास
तिला नावीन्याची आस
तिच्या अस्तित्वाचा भास
काय वर्णावे..!”

🎯“माय मराठीचा दिमाख आगळा
वर्णाक्षर अन् बाराखडीचा साज वेगळा
विरामचिन्हांच्या अलंकाराने ती सजली
वृतांच्या बागेतून शब्द फुले उमलली
ज्ञानोबा, तुकोबा, जनाई आदी मेळा संतांचा,
हर एक मराठी मावळा छत्रपती शिवरायांचा.
जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मराठी”

🎯“जन्मदात्री ने जग दाखवले
माय मराठी ने जग शिकवले
भिन्न धर्म व भिन्न जाती
महाराष्ट्राची अतुल्य संस्कृती
अभिमान हा जन मनी वसे
मराठी आपली मायबोली असे
मराठी दिनाच्या शुभेच्छा”