एका मुलाची आई बनली ‘मिस युनिव्हर्स’, स्पर्धेत नवा इतिहास! पाहा काय बदलले नियम

मिस युनिव्हर्स मध्ये फक्त लग्न न झाल्याचं मुली भाग घेऊ शकत होत्या पण आता विवाहित असणे ही आता 'मिस युनिव्हर्स' बनण्यातील अडचण राहिलेली नाही. पोर्तो रिकोच्या जेनिफर बॅरेटो ही पहिली विवाहित 'मिस युनिव्हर्स' ठरली आहे. नियमांमध्ये काय बदल झाले आहेत हे जाणून घ्या.

एका मुलाची आई बनली मिस युनिव्हर्स, स्पर्धेत नवा इतिहास! पाहा काय बदलले नियम
miss universe 2026 rule change
| Updated on: Nov 25, 2026 | 3:18 PM

मिस युनिव्हर्स याच नावातच मिस असं आहे. त्यावरूनच समजत की, लग्न न झालेल्या मुली यामध्ये भाग घेऊ शकतात. पण यंदा चक्क एक विवाहित महिला ‘मिस युनिव्हर्स’ झाली आहे. आता परिस्थिती बदलली आहे. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सॅन जुआन येथे पार पडलेल्या ७५ व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत पोर्तो रिकोच्या जेनिफर बॅरेटो हिने विजय मिळवून इतिहास घडवला. हा किताब जिंकणारी ती पहिली विवाहित महिला आणि पहिली माता ठरली आहे. तिच्या या विजयामुळे नियमांमधील त्या बदलांकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे, ज्यांनी जवळपास सात दशके चाललेली एक परंपरा संपुष्टात आणली. नेमके कोणते नियम बदलले गेले आहेत, ते जाणून घ्या.

पूर्वीचे नियम काय होते?

‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेची सुरुवात १९५२ मध्ये अमेरिकेतील लाँग बीच येथे झाली. त्या पहिल्या सिजनमध्ये फिनलंडची आर्मी कुसेला ही पहिली विजेती ठरली. तिने आपला कार्यकाळ संपण्यापूर्वीच लग्नासाठी आपला मुकुट सोडून दिला होता. त्यानंतर अनेक दशकांपर्यंत, नियमांनुसार स्पर्धक अविवाहित असणे आणि विजेती म्हणून आपला संपूर्ण पूर्णवेळ अविवाहित राहणे अनिवार्य होते. पण या निमियामुळे ऑगस्ट २०२२ पर्यंत, या स्पर्धेत केवळ १८ ते २८ वयोगटातील अशा महिलांनाच सहभागी होता येत असे, ज्यांचे कधीही लग्न झाले नव्हते आणि ज्यांना मुले नव्हती. तसेच, गर्भवती महिलांनाही या स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी नव्हती.

Loading...

ऑगस्ट २०२२ मध्ये नियमात बदल!

ऑगस्ट २०२२ मध्ये, ‘मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन’ने राष्ट्रीय संचालकांना पाठवलेल्या एका निवेदनात महत्त्वपूर्ण बदलांची घोषणा केली. पहिल्यांदाच, विवाहित महिला, माता आणि गर्भवती महिलांना या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली. हा नियम २०२३ मध्ये झालेल्या स्पर्धेच्या ७२ व्या सिजनपासून लागू झाला. आयोजकांच्या मते, महिलांना स्वतःच्या आयुष्यावर पूर्ण अधिकार असावा आणि वैयक्तिक निर्णय त्यांच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरू नयेत. यामुळेच हा निर्णय घेण्यात आला. ज्याचा फायदा अनेकांना झाला.

वयोमर्यादा हटवली!

यासोबत अजून एका महत्त्वपूर्ण नियमाच स्वागत करण्यात आलं. सप्टेंबर २०२३ मध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. संस्थेने वयोमर्यादेची सीमा काढून टाकली, ज्यामुळे १८ वर्षांवरील कोणतीही महिला २०२४ च्या स्पर्धेत सहभागी होऊ शकते. या निर्णयामुळे २८ वर्षांची पूर्वीची वयोमर्यादा आता इतिहासजमा झाली आहे.

सध्याच्या अटी काय?

सध्याच्या अटी अत्यंत साध्या आहेत. स्पर्धक किमान १८ वर्षांची असावी आणि तिने आपल्या मायदेशात ‘मिस युनिव्हर्स’ संस्थेशी संबंधित राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकलेली असावी. वैवाहिक स्थिती किंवा अपत्य असणे, हे आता निकष राहिलेले नाहीत. ज्या स्पर्धक विजेत्या ठरतात किंवा उपविजेत्या म्हणून स्थान मिळवतात, त्यांना आपल्या कार्यकाळात इतर कोणत्याही सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्यास मनाई आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us