AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar: ‘धुरंधर’मध्ये खऱ्या घटना दाखवल्या, पण..; निवृत्त कर्नल हनी बक्षी यांचा मोठा खुलासा

Dhurandhar: रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटातील घटना खऱ्या की काल्पनिक? निवृत्त कर्नल आणि अभिनेता हनी बक्षी यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. नेमकं काय म्हणाले हनी बक्षी? जाणून घ्या..

Dhurandhar: 'धुरंधर'मध्ये खऱ्या घटना दाखवल्या, पण..; निवृत्त कर्नल हनी बक्षी यांचा मोठा खुलासा
Ranveer SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 25, 2026 | 3:07 PM
Share

Dhurandhar: अभिनेता रणवीर सिंह याचा ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजले. दिग्दर्शक आदित्य धरच्या या फ्रँचायझीने केवळ कमाईच केली नाही, तर चित्रपटात दाखवण्यात आलेल्या घटनांवरून मोठी चर्चाही घडवून आणली. विशेषतः पाकिस्तानमधील घडामोडी, अंडरवर्ल्ड आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित घटनांचं चित्रण कितपत सत्य आहे, यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. आता निवृत्त कर्नल आणि अभिनेता हनी बक्षी यांनी याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. निवृत्त कर्नल मुनीश्वर नाथ बक्षी यांना हनी बक्षी या नावाने ओळखलं जातं. नुकत्याच झालेल्या नॅशनल सिक्युरिटी समिटमध्ये वृत्तसंस्था ANI सोबत बोलताना त्यांनी ‘धुरंधर’ चित्रपटाच्या सत्यतेबाबत आपलं मत मांडलं.

ते म्हणाले की, आता मी चित्रपटसृष्टीशी जोडले गेलो असल्यामुळे या चित्रपटाबाबत सांगू शकतो. ‘धुरंधर’ ही सत्य घटनांवर आधारित काल्पनिक कथा आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या घटना प्रत्यक्षात घडल्या आहेत. मात्र त्या घटनांना जोडून तयार करण्यात आलेली कथा काल्पनिक आहे. त्यामुळे चित्रपटातील प्रत्येक प्रसंग किंवा कथानक जसंच्या तसं वास्तवात घडलं होतं, असा अर्थ काढता येणार नाही. प्रत्यक्ष घटनांचा आधार घेऊन त्याला सिनेमॅटिक स्वरूप देण्यात आलं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

चित्रपटात प्रत्यक्ष आयुष्यातील घटनांचं चित्रण पाहून त्यांची प्रतिक्रिया काय होती, असा प्रश्नही हनी बक्षी यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मिश्किल उत्तर दिलं. ते म्हणाले, दुर्दैवाने तोपर्यंत मी दारू पिणं सोडलं होतं. अन्यथा घरी जाऊन एक ड्रिंक नक्की घेतलं असतं.

पाकिस्तानी पत्रकारानेही केला होता दावा

दरम्यान, याआधी पाकिस्तानी पत्रकार आणि ल्यारिचे माजी महापौर आरिफ अजाकिया यांनीही ‘धुरंधर’मधील घटनांबाबत भाष्य केलं होतं. चित्रपटात दाखवलेल्या घटनांच्या काळात आपण कराचीमधील एका शहराचे महापौर होतो आणि ल्यारिमध्येच आपला जन्म झाल्यामुळे तिथल्या परिस्थितीची आपल्याला माहिती आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या अनेक गोष्टी सत्य असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ फ्रँचायझीमध्ये रणवीर सिंहसोबत आर. माधवन, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, संजय दत्त, सारा अर्जुन, राकेश बेदी आणि दानिश पांडोर यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटाचा पहिला भाग 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला, तर ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ हा दुसरा भाग 19 मार्च 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.

Follow Us
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण, शिवेंद्रराजे...
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या निर्णयावरून राजकारण तापलं; शिवेंद्रराजेंनी विरोधकांना सुनावलं!
मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा..
Pune Case : मुंबईत भरदिवसा रक्ताचा सडा! सुप्रिया सुळे संतापल्या; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटना
Pune : पुण्याच्या औधमध्ये जिल्हा रुग्णालय परिसरात शेकडो रुग्णवाहिका उद्धघाटनाच्या प्रतिक्षेत, अरोग्यमंतत्री...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट, मोहन भागवतांनी...
भारतामध्ये भाषा, धर्म, परंपरा वेगळ्या तरीही एकजूट कशी? मोहन भागवतांनी सांगितलं भारतीय एकतेचं रहस्य!
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात
पुणे कोर्टाबाहेर थरार! आधी गोळीबार, मग कोयत्याने जीवघेणा हल्ला; शहरात खळबळ
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले...
25 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर संजय शिरसाट आक्रमक; म्हणाले, 'पुरावे...
ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर...; संजय शिरसाटांचा राऊतांना थेट इशारा
Sanjay Shirsat : ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तर लटकावून टाकीन..; संजय शिरसाटांचा संजय राऊतांना थेट इशारा
ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? शिरसाटांनी पहिल्यांदा सांगितलं कारण
Sanjay Shirsat on Raut : उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात का नव्हतो? संजय शिरसाटांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण, म्हणाले...
राऊतांच्या आरोपांना शिरसाटांचं प्रत्युत्तर; विकासकामांचा पाढाच वाचला
Sanjay Shirsat on Sanjay Raut : संजय राऊतांच्या आरोपांना संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर; विकासकामांचा पाढाच वाचला
2003 मध्ये फेटाळलेला प्रकल्प आता अचानक व्यवहार्य कसा? अदानी कंपनीला...
Amravati : 2003 मध्ये फेटाळलेला प्रकल्प आता अचानक व्यवहार्य कसा? अदानी कंपनीला कायदेशीर नोटीस