Post Office Senior Citizen Scheme: केवळ एकदा गुंतवणूक करा आणि दर 3 महिन्यांनी 53,300 मिळवा; जाणून घ्या संपूर्ण गणित
निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळावं आणि गुंतलेली रक्कम सुरक्षित राहावी, अशी अनेक ज्येष्ठ नागरिकांची इच्छा असते. अशा लोकांसाठी पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागिरक बचत योजना ( SCSS ) हा एक पर्याय आहे

पत्नीला जॉईंट खातेदार करता येतं का? : SCSS खातं वैयक्तिक किंवा पती- पत्नीसोबत संयुक्त स्वरूपात उघडता येतं. संयुक्त खात्यातील संपूर्ण गुंतवणूक पहिल्या खातेदाराच्या नावावर मोजली जाते. त्यामुळे खातं उघडताना पहिल्या खातेदाराची पात्रता आणि गुंतवणूकीची मर्यादा महत्त्वाची असते. दुसऱ्या खातेदाराच्या वयावर स्वतंत्र अट नाही.
- कसे मिळणार 53,300 रूपये : या योजनेत सध्या 8.2% व्याज वार्षिक व्याजदर लागू आहे.उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने 26 लाख रूपये गुंतवल्यास वर्षभरांच व्याज 2 लाख 13 हजार 200 रूपये होईल. ही रक्कम चार तिमाहींमध्ये विभागल्यास दर तीन महिन्यांनी 53,300 रुपये मिळतात.
- मात्र हे व्याजदरानुसार केलेलं गणित आहे. खातं तिमाहीच्या मध्यात उघडलं असल्यास पहिलं व्याज पूर्ण तीन महिन्यांनी मिळत नाही. त्यानंतर नियमानुसार दर तिमाहीला व्याज दिलं जातं.
- पत्नीला जॉईंट खातेदार करता येतं का? : SCSS खातं वैयक्तिक किंवा पती- पत्नीसोबत संयुक्त स्वरूपात उघडता येतं. संयुक्त खात्यातील संपूर्ण गुंतवणूक पहिल्या खातेदाराच्या नावावर मोजली जाते. त्यामुळे खातं उघडताना पहिल्या खातेदाराची पात्रता आणि गुंतवणूकीची मर्यादा महत्त्वाची असते. दुसऱ्या खातेदाराच्या वयावर स्वतंत्र अट नाही.
- कोण उघडू शकतं हे खाते? : सर्वसाधारणपणे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या व्यक्तींना या योजनेत खाते उघडता येतं. काही निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना 55 ते 60 वयोगटात, तर निवृत्त संरक्षण कर्मचाऱ्यांना 50 ते 60 वयोगटात ठराविक अटी पूर्ण केल्यास खाते उघडण्याची परवानगी आहे.
- या योजनेत किमान 1,000 रूपये गुंतवता येतात. एका व्यक्तीच्या सर्व SCSS खात्यांमधील एकूण गुंतवणूक 30 लाख रूपयांपेक्षा जास्त असू शकत नाही. खात्याचा कालावधी पाच वर्षांचा असून नियमांनुसार आणखी 3 वर्षांसाठी मुदतवाढ घेता येतेय
- व्याजावर कर लागू होतो : या योजनेतून मिळणारं व्याज करपात्र असतं. त्यामुळे प्रत्यक्ष हातात मिळणारी रक्कम कराच्या नियमानुसार बदलू शकते. गुंतवणूक करण्यापूर्वी पात्रता, कर आणि मुदतपूर्व पैसे काढण्याचे नियम तपासणं आवश्यक आहे.
- (टीप- माहिती फक्त व्यावहारिक ज्ञानावर अवलंबून आहे,गुंतवणूक करण्याआधी याबद्दल संपूर्ण माहिती जवळच्या पोस्ट ऑफिसमधून घ्या. वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)
Follow Us








