Video: एमबीएचा विद्यार्थी लग्नात फुकटचं खायला गेला, मग धुवावी लागली वऱ्हाडाची ताटं, पाहा व्हिडीओ

लग्नात फुकटचं खाताना विद्यार्थी सापडला, मग...

Video: एमबीएचा विद्यार्थी लग्नात फुकटचं खायला गेला, मग धुवावी लागली वऱ्हाडाची ताटं, पाहा व्हिडीओ
MBA student
Image Credit source: twitter
| Updated on: Dec 02, 2022 | 8:37 AM

मुंबई : लग्नातलं जेवणं (Wedding food) म्हणजे अनेकांच्या आवडीचं असतं. भारतात लग्न कार्यात कुणी कोणाचा पाहुणा असं विचारत नाही, कारण असंख्य पाहुणे वधू-वराला आर्शिवार्द देण्यासाठी आलेले असतात. परंतु मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) एक भलतीचं घटना उघडकीस आली आहे, तिथं एका लग्न कार्यात एमबीएच्या विद्यार्थ्याला (MBA Student) वऱ्हाडाची भांडी घासावी लागली आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे. अशा घटना आपण अनेकदा चित्रपटामध्ये पाहत असतो. परंतु ही घटना खरी असल्याचे एका वेबसाईटने म्हटले आहे.

मध्यप्रदेशातील जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये विद्यार्थी न बोलावता लग्नात जेवायला गेला होता. त्यामुळे तिथल्या काही लोकांनी त्याला भांडी घासण्याची शिक्षा दिली आहे.

त्या व्हिडीओतलं संभाषण

एमबीएच्या विद्यार्थ्याला एक व्यक्ती विचारत आहे की, फुकट जेवणं करण्याची शिक्षा तुला माहित आहे का ? तू तुझ्या घरातील भांडी नीट घासतो का ? त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला त्या व्यक्तीला कुठे राहतोस असं विचारलं. विशेष म्हणजे तो एमबीएचा विद्यार्थी जबलपूरचा आहे. तो भोपाळमध्ये एमबीएचं शिक्षण घेण्यासाठी आला आहे.

ज्या व्यक्तीने तो व्हिडीओ तयार केला आहे. त्याने त्या विद्यार्थ्याला तुझे आई-बाबा तुला पैसे पाठवत नाहीत का ? तू जबलपूरचं नाव का खराब करीत आहे असा प्रश्न विचारला आहे. शेवटी भांडी घासल्यानंतर तुला आता कसं वाटतं आहे ? यावर विद्यार्थी म्हणतो, मला फुकट खायचं म्हटल्यावर कायतरी करावं लागेल.