VIRAL VIDEO : विषारी साप आणि मुंगूसाची जबरदस्त फायटिंग, शेवटी कोण जिंकलं तुम्हीच पाहा…

विषारी साप आणि शिकारी मुंगूसचे वैर कुणापासून लपलेले नाही. जेव्हा जेव्हा हे दोघे समोरासमोर येतात तेव्हा त्यांच्यात रक्तरंजित युद्ध सुरू होते.

VIRAL VIDEO : विषारी साप आणि मुंगूसाची जबरदस्त फायटिंग, शेवटी कोण जिंकलं तुम्हीच पाहा...
| Edited By: | Updated on: Mar 30, 2021 | 3:05 PM

साप आणि मुंगूस (Snake And Mongoose) यांची भांडणं तर सगळ्यांनाच माहिती आहेत. विषारी साप आणि शिकारी मुंगूसचे वैर कुणापासून लपलेले नाही. जेव्हा जेव्हा हे दोघे समोरासमोर येतात तेव्हा त्यांच्यात रक्तरंजित युद्ध सुरू होते. बर्‍याचदा या दोघांच्या भांडणाचे आश्चर्यचकित करणारे व्हीडिओ सोशल मीडियावरही (Social Media) व्हायरल होत असतात. (mongoose and cobra fight see what happen next viral video)

या लढाईची सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे साप किती विषारी असला तरी मुंगूसासमोर त्याचे काही चालत नाही. हेच कारण आहे की, जेव्हा जेव्हा एखादा साप मुंगूसला भेटतो तेव्हा साप चुपचाप निघून जाण्याच्या प्रयत्नात असतो. याचे अनेक भयानक व्हीडिओही आपण सोशल मीडियावर पाहिले असतील. आताच्या या युद्धात साप स्वत: चा बचाव करण्यासाठी खूप प्रयत्न करतो, परंतु शिकारी मुंगूस त्याला जोरदारपणे खाली पाडतो. सरतेशेवटी, या दोघांच्या भांडणाला खूप रोमांचक वळण लागतं. हा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोकांकडूनही त्याला खूप पसंती दिली जात आहे.

तुम्हीही पहा व्हीडिओ

व्हीडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका ठिकाणी किंग कोब्रा अतिशय आरामात फिरत आहे, पण नंतर शिकारी मुंगूस त्याच्याकडे आला आणि त्याने त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्यावर हल्ला केला. मुंगूसाला समोर पाहून साप अत्यंत घाबरला आणि स्वत: च्या बचावासाठी मुंगूसाला घाबरायचा प्रयत्न केला आणि दोघे आमनेसामने येतात, त्यानंतर दोघांमध्ये एक रक्तरंजित युद्ध सुरू होते.

जेव्हा मुंगूस सापवर हल्ला करतो तेव्हा साप वारंवार त्याचा हल्ला टाळण्याचा प्रयत्न करतो. साप पळून जाण्याचाही प्रयत्न करत असतो परंतु मुंगूसही त्याच्या मागे पळायला लागतो. कोब्रा पळून गेला आणि मुंगूस त्याचा पाठलाग करत आहे. शेवटी, आपला जीव वाचवण्यासाठी साप एका बिळात जातो, यावेळी मुंगूसही बिळामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो पण त्याला आतमध्ये जाता येत नाही. (mongoose and cobra fight see what happen next viral video)

संबंधित बातम्या – 

Video | बाळाने पहिलं पाऊल टाकलं, वडिलांची रिअ‌ॅक्शन पाहून नेटकरी भावूक; व्हिडीओ एकदा पाहाच

VIDEO | औरंगाबादमध्ये महिला पोलीस निरीक्षकाचा पोलीस स्टेशनसमोर बंजारा डान्स

VIDEO : भित्र्या सशाची बिबट्यापेक्षा मोठी झेप, पाठलागाचा थरारक व्हिडीओ

(mongoose and cobra fight see what happen next viral video)