Video | बाळाने पहिलं पाऊल टाकलं, वडिलांची रिअ‌ॅक्शन पाहून नेटकरी भावूक; व्हिडीओ एकदा पाहाच

Video | बाळाने पहिलं पाऊल टाकलं, वडिलांची रिअ‌ॅक्शन पाहून नेटकरी भावूक; व्हिडीओ एकदा पाहाच
बाळाने पहिलं पाऊल टाकताच वडिलांचा आनंद गगनात मावला नाही.

आपल्या छोट्या बाळाने पहिलं पाऊल टाकताच एका वडिलाचा गगनात न मावणारा आनंद सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. (small baby first step video)

prajwal dhage

|

Mar 29, 2021 | 7:22 PM

मुंबई : आई-वडिलांचं आपल्या आपत्याशी एक वेगळंच नातं असतं. आपल्या मुलाशी पालकांचे वेगळेच भावबंध असतात. मुलाच्या जन्मापासून ते यशोशिखर गाठण्यापर्यंतच्या प्रवासात आई-वडिलांचा मोठा वाटा असतो. आईवडील आपल्या मुलाची प्रत्येक प्रगती त्यांच्या डोळ्यात साठवून ठेवतात. असाच एका वडिलाच्या आयुष्यातील गोड प्रसंग सध्या व्हायरल होत आहे. आपल्या छोट्या बाळाने पहिलं पाऊल (small baby first step) टाकताच एका वडिलांचा गगनात न मावणारा आनंद सध्या चर्चेचा विषय ठरतोय. (small baby takes first step dad reaction video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

व्हिडीओमध्ये दिसतंय त्या प्रमाणे एक हलान बाळ चालण्याचा माडोका-तोडका प्रयत्न करत आहे. या बाळाला त्याचं पहिलं पाऊल टाकण्यासाठी त्याचे आई-वडील प्रेरित करत आहेत. त्यानंतर मोठ्या प्रयत्नानंतर व्हिडीओतील छोटं बाळ आपलं पहिलं पाऊल टाकतं आणि आपल्या आईकडे झेप घेतं. आपल्या बाळाने टाकलेले पहिले पाऊल पाहताच, व्हिडीओतील माणसाला अत्यंत आनंद झालेला आहे. आपल्या बाळाने पहिलं पाऊल टाकल्यानंतर त्याच्या वडिलाने आपले हात तोंडाला लावत आश्चर्य व्यक्त केले. तसेच हा नजारा पाहून व्हिडीओतील वडिलाच्या डोळ्यांत आनंदाश्रू फुटले आहेत.

आईचासुद्धा आनंद गगनात मावेना

बाळाने पहिलं पाऊल टाकल्यानंतर जेवढा आनंद वडिलांना होतो तेवढाच आनंद आईलासुद्धा होतो. या व्हिडीओमध्येसुद्धा जेवढा आनंद बाळाच्या वडिलांना झाला आहे; तेवढाच आनंद त्याच्या आईलासुद्धा झाल्याचे दिसत आहे. आपल्या बाळाने पहिले पाऊल टाकताच या आईने आनंदाने आपल्या बाळाला जवळ घेतलं आहे. व्हिडीओतील आई आपल्या बाळाला आनंदाने कुरवाळताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, आई आणि वडिलांचा आनंद या व्हिडीओमध्ये कैद झाल्यामुळे नेटकऱ्यांकडून या व्हिडीओला चांगलीच पसंती मिळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहत असून भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. बाळानं पहिलं पाऊल टाकणं हा वडिलासाठी सर्वात महत्त्वाचा आणि भवूक क्षण असतो असं, काही जणांनी म्हटलं आहे. तर अतिशय क्यूट म्हणत काही जणांनी या व्हिडीओला त्यांच्या अकाऊंटवरुन शेअर केलं आहे.

इतर बातम्या :

VIDEO | औरंगाबादमध्ये महिला पोलीस निरीक्षकाचा पोलीस स्टेशनसमोर बंजारा डान्स

VIDEO : प्रत्येक भारतीयाच्या अंगावर शहारे येतील; अमेरिकन नौदलाच्या जवानांनी गायलं ‘ये जो देस है तेरा’

VIDEO | गायीची काळजी घेण्यासाठी महिला सरसावली; हात लावला अन् भलतंच घडलं, व्हिडीओ व्हायरल

(small baby takes first step dad reaction video goes viral on social media)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें