सिंहापासून जीव वाचविण्यासाठी माकडांनी लढवली शक्कल, खूप हसाल…बघा व्हिडीओ!

या प्राण्यांची रोज जीव वाचवण्यासाठी धडपड असते. कधी कुणी कुणाचं शिकार असतं तर कधी कुणी कुणाचा शिकारी असतो. प्रत्येकाची धडपड ही स्वतःचं आयुष्य वाचविण्यासाठी! असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एका पुलावर सिंह असतात.

सिंहापासून जीव वाचविण्यासाठी माकडांनी लढवली शक्कल, खूप हसाल...बघा व्हिडीओ!
Monkey and lion
| Updated on: Jun 24, 2023 | 5:00 PM

मुंबई: प्राण्यांशी संबंधित धक्कादायक व्हिडिओ दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्राण्यांचं जग भयानक असतं. तिथे चपळ, चलाख, भयानक प्राणी अस्तित्वात असतात. या प्राण्यांची रोज जीव वाचवण्यासाठी धडपड असते. कधी कुणी कुणाचं शिकार असतं तर कधी कुणी कुणाचा शिकारी असतो. प्रत्येकाची धडपड ही स्वतःचं आयुष्य वाचविण्यासाठी! असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एका पुलावर सिंह असतात. सिंह बघू तिथे असणारी माकडं लपून बसतात. ते असे लपून बसतात की हा व्हिडीओ बघून अंगावर काटा येतो.

सिंहाला जंगलाचा राजा म्हटले जाते कारण त्याच्या एका गर्जनाने संपूर्ण जंगल थरथरायला लागते. सिंह जंगलात फिरायला गेल्यावर सगळे प्राणी लपून बसतात कारण कुणी कधी त्याची शिकार होईल काय सांगता येत नसतं. आता ही क्लिप बघा जिथे सिंहिणी माकडाची शिकार करण्यासाठी माकडाला शोधत आहे, पण माकडांची टोळी त्यांची शिकार करू शकत नाही कारण सिंहाला बघताच माकडं लपून बसतात.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पुलावरून सिंहिणींचा कळप जात आहे. या दरम्यान त्यांची नजर माकडांच्या टोळीवर पडते आणि ते त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी धावतात, पण माकडेही कमी नाहीत, त्यांचा मृत्यू टाळण्यासाठी ते पुलाखाली लपून बसतात. इच्छा असूनही सिंहिणींचा कळप अशा ठिकाणी पोहोचू शकत नाही. एकीकडे सिंहिणीचा कळप माकडांच्या शोधात असताना दुसरीकडे पुलाखाली माकडं मस्तीने विश्रांती घेत आहेत.