पावसाळ्यात डासांना ‘ही’ स्वस्त मशीन करेल छुमंतर, जाणून घ्या किंमत

पावसाळ्यात डास प्रार्दुभाव वाढत असतो आणि ते आपल्या सर्वांसाठी त्रासदायक बनते. पण आता काळजी करायच नाही. कारण हा लॅम्प दिवा तुमच्या घरातील डास काही मिनीटांतच छुमंतर करेल. तर हा लॅम्प तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून कसा खरेदी करु शकता ते ही स्वस्तात जाणून घेऊयात...

पावसाळ्यात डासांना ही स्वस्त मशीन करेल छुमंतर, जाणून घ्या किंमत
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jul 09, 2025 | 5:09 PM

पाऊस पडताच घरांमध्ये डासांचा प्रार्दुभाव वाढतो. उघड्या पाण्यामुळे, ओलावा आणि आर्द्रतेमुळे डासांची पैदास वेगाने होते. त्यामुळे आजकाल घरात डासांची फौज दिसते. ज्यामुळे रात्रीची झोप तर बिघडतेच त्यासोबतच या डासांमुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियासारखे आजार होत असतात. तर ही समस्या टाळण्यासाठी बहुतेक लोकं कॉइल, स्प्रे यांसारख्या केमिकलचा वापर करतात, जे केवळ डासांना मारत नाहीत तर आपल्या आरोग्यावरही हानिकारक परिणाम करू शकतात.

पण आता तुम्हाला या केमिकलयुक्त गोष्टींची गरज भासणार नाही, कारण बाजारात मॉस्किटो किलर लॅम्प उपलब्ध आहे. जो डासांपासून मुक्ती मिळवू शकतो. त्याची किंमतही फार जास्त नाही.

मॉस्किटो किलर लॅम्प म्हणजे काय?

हा एक यूएसबी पॉवर असलेला इलेक्ट्रिक लॅम्प आहे जो यूव्ही लाईट आणि ट्रॅपच्या मदतीने डासांना आकर्षित करतो आणि त्यांना मारतो. ही मशीन विशेषतः अशा लोकांसाठी बनवली आहे ज्यांना धूर, वास यांचा त्रास होत असतो, त्यांच्या घरात डासांपासून मुक्ती मिळवायची असेल तर हा लॅम्प फायदेशीर आहे.

या मॉस्किटो किलर लॅम्प फिचर्स

तर या लॅम्प मध्ये कोणतेही विषारी पदार्थ किंवा स्प्रे वापरले जात नाही. त्यामुळे ते मुलांसाठी आणि समजा तुमच्या घरात असलेल्या पाळीव प्राण्यांसाठी देखील सुरक्षित आहे. या लॅम्पच्या निळ्या अतिनील प्रकाशाकडे डास आकर्षित होतात आणि नंतर त्याला जोडलेल्या पंख्याच्या मदतीने त्यांना आत ओढले जाते.

तुम्ही ते लॅपटॉप, मोबाईल चार्जर, पॉवर बँक किंवा कोणत्याही यूएसबी पोर्टवरून चालवू शकता. म्हणजेच तुम्हाला रात्री लाईट गेल्यावरही चिंता करायची गरज भासणार नाही. तसेच या लॅम्पमध्ये कोणताही करंट किंवा स्फोट होत नाही. ते डासांना अतिशय शांत पद्धतीने मारते. तर यामध्ये तळाशी एक कंटेनर आहे ज्यामध्ये मृत डास जमा होतात. तुम्ही ते सहजपणे काढू शकता आणि स्वच्छ करू शकता.

हा लॅम्प कसा वापरायचा?

जर तुम्हाला घरी मॉस्किटो किलर लॅम्प कसा बसवायचा असा प्रश्न पडत असेल, तर USB केबलने डिव्हाइसला कोणत्याही चार्जिंग सोर्सशी कनेक्ट करा.

खोलीच्या अशा कोपऱ्यात ठेवा जिथे कमी प्रकाश असेल. कारण अंधारात अतिनील प्रकाश डासांना जास्त आकर्षित करतात. दार आणि खिडक्या बंद करा आणि लॅम्प थोडा वेळ चालू ठेवा. काही तासांत तुम्हाला दिसेल की डास कमी झाले आहेत.

कुठे खरेदी करायचा?

तुम्ही मॉस्किटो किलर लॅम्प हा Amazon, Flipkart किंवा स्थानिक इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकता. त्याची किंमत तुम्हाला 500 ते 1500 रुपयांपर्यंत खरेदी करु शकता.