फ्रेंच, इटालियन, जर्मन, अरबी, इराणी, रशियन, जपानी दहा वर्षांचा रस्त्यावरील मुलगा बोलतो अनेक भाषा, विदेशातील पर्यटक थक्क

Viral Video: मोरपंख विकणारा मसलन याला फ्रान्समधून आलेला पर्यटक मिळाला. त्यानंतर तो फ्रेच भाषेचा वापर करु लागला. व्हिडिओत तो फ्रेंचमध्ये बोलताना दिसत आहे. त्याला इंग्रजीसुद्धा येते. एका पर्यटकाने त्याचा व्हिडिओ तयार करुन व्हायरल केला.

फ्रेंच, इटालियन, जर्मन, अरबी, इराणी, रशियन, जपानी दहा वर्षांचा रस्त्यावरील मुलगा बोलतो अनेक भाषा, विदेशातील पर्यटक थक्क
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 3:50 PM

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओच्या माध्यमातून नेटकऱ्यांना नवनवीन गोष्टींची माहिती होते. परंतु मुंबईतील एका दहा ते बारा वर्षांच्या मुलाचा व्हिडिओ वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. रस्त्यावर मोरपंख विक्री करणाऱ्या मुलाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत ते परदेशी पर्यटकाशी संवाद साधत आहे. त्याची अस्खलीत फ्रेंच पाहून पर्यटक गार पडला. त्याचा हा व्हिडिओ चांगला व्हायरल झाला आहे.

शाळेत न जाता शिकला अनेक भाषा

मुंबईतील रस्त्यावर भटकणाऱ्या दहा ते बारा वर्षांचा मसलन नावाचा मुलगा व्हिडिओत दिसत आहे. उपजिवेकेसाठी तो मोरपंख विक्री करतो. यामुळे शिक्षणाचा गंध त्याला काहीच नसणार, हे स्पष्ट होते. कोणत्याही शाळेत न जातो तो सहा ते सात विदेशी भाषा बोलताना दिसत आहे. विदेशी पर्यटकास त्यांच्याच भाषेतून तो संवाद साधत आहे. इंग्रजी, फ्रेंच, इटालियन, जर्मन, अरबी, इराणी, रशियन, जपानी या भाषेत तो बोलत आहे.

हे सुद्धा वाचा

मोरपंख विकणारा मुलाने पाडला प्रभाव

मोरपंख विकणारा मसलन याला फ्रान्समधून आलेला पर्यटक मिळाला. त्यानंतर तो फ्रेच भाषेचा वापर करु लागला. व्हिडिओत तो फ्रेंचमध्ये बोलताना दिसत आहे. त्याला इंग्रजीसुद्धा येते. एका पर्यटकाने त्याचा व्हिडिओ तयार करुन व्हायरल केला. त्याच्यातील ही प्रतिभा बघून पर्यटक थक्क झाल्याचे दिसत आहे. त्या व्हिडिओवर अनेकांनी कॉमेंट दिल्या आहेत. लाईक हजारो जणांनी केला आहे.

सोशल मीडियावर त्या मुलाच्या प्रतिभेची कौतूक केले जात आहे. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणारे मुले इतक्या सफाईदारपणे इंग्रजी बोलू शकत नाही, परंतु तो मुलगा ते बोलत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले.
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले.
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार.
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड.
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार.
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.