AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lok Sabha Elections 2024 : 7 किलो सोने, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी, आलिशान गाड्या अन् बंगले, कंगना कोट्यवधींची मालकीन

Kangana Ranaut Net Worth: कंगानाचा मुंबईत फ्लॅट मनालीमध्ये शानदार बंगला आहे. मनालीत घराची किंमत 25 कोटी रुपये आहे. मुंबईत पाच बेडरूमचा फ्लॅट आहे. त्याची किंमत 15 ते 20 कोटी आहे. मुंबईत पाली हिलमध्ये एक मोठे कार्यालय आहे.

Lok Sabha Elections 2024 : 7 किलो सोने, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी, आलिशान गाड्या अन् बंगले, कंगना कोट्यवधींची मालकीन
कंगना रनौत
| Updated on: May 15, 2024 | 11:27 AM
Share

लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. त्याचवेळी देशातील इतर टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज भरले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात बॉलीवूड स्टारही उतरले आहेत. ‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनु’ यासारखे शानदार चित्रपट देणारी कंगना राणावत (Kangana Ranaut) निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या कंगनाने राजकारणात एन्ट्री केली आहे. मंगळवारी तिने हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा (Mandi Lok Sabha Seat) मतदार संघातून भारतीय जनता पक्षाकडून (BJP) उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जासोबत संपत्तीचे माहिती देणारे प्रतिज्ञापत्र तिने जोडले आहे.

कंगना केवळ बारावी उत्तीर्ण

कंगना राणावत मुळची हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातीलच आहे. तिचा जन्म 23 मार्च 1987 रोजी मंडी जिल्ह्यात झाला. कंगना केवळ बारावी उत्तीर्ण आहे. तिने निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार तिच्याकडे 90 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. तिच्याकडे दोन लाखांची रोकड आहे. सर्व बँक खाते, शेअर, ज्वेलरी मिळून जंगम मालमत्ता 28 कोटी 73 लाख 44 हजार 239 रुपये आहे. स्थावर मालमत्ता 62 कोटी 92 लाख 87 हजार रुपये आहे. तिच्यावर 17 कोटी 38 लाख रुपये कर्जसुद्धा आहे.

सोने, चांदी अन् हिरे

कंगना राणावतकडे 6 किलो 700 ग्रॅम सोने आणि दागिने आहेत. या सोन्याची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. तसेच 60 किलो चांदी आहे. चांदीची किंमत 50 लाख रुपये आहे. तिच्याकडे कोट्यवधी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने आहेत. त्यांची किंमत 3 कोटींहून अधिक आहे.

महागड्या गाड्यांची आवड

कंगनाला महागड्या आणि आलिशान कारचीही आवड आहे. तिच्याकडे एकापेक्षा एक आलिशान गाड्या आहेत. तिने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन गाड्यांचा उल्लेख केला आहे. त्यात एक BMW 7-Series आहे आणि दुसरी Mercedes Benz GLE SUV आहे. या दोन्ही कारची एकूण किंमत 1.56 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

50 LIC पॉलिसी

कंगना राणावत हिच्या पाच, दहा नाही तर 50 एलआयसी पॉलिसी आहेत. या सर्व पॉलिसी एकाच दिवशी 4 जून 2008 काढल्या होत्या. तिची शेअरमध्ये चांगली गुंतवणूक आहे. तिच्याकडे मनिकर्णिका फिल्म्स प्राइवेट लिमिटेड के 9999 शेअर आहे. तिने 1.20 पेक्षा जास्त रक्कम शेअरमध्ये गुंतवली आहे.

मुंबई अन् मनालीत शानदार बंगला

कंगानाचा मुंबईत फ्लॅट मनालीमध्ये शानदार बंगला आहे. मनालीत घराची किंमत 25 कोटी रुपये आहे. मुंबईत पाच बेडरूमचा फ्लॅट आहे. त्याची किंमत 15 ते 20 कोटी आहे. मुंबईत पाली हिलमध्ये एक मोठे कार्यालय आहे. त्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. तिला चित्रपट आणि जाहिरातीतून चांगले उत्पन्न मिळते.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.