मुंबई गर्ल वराच्या शोधात, अटी काय?, भन्नाट जाहिरात व्हायरलं; पण तिचं पॅकेज किती?

| Updated on: Apr 04, 2024 | 6:53 PM

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगणे फार जास्त कठीण काम आहे. एका रात्रीमध्ये सोशल मीडियामुळे अनेकजण स्टार होतात. सध्या सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा स्क्रीनशॉट पाहून अनेकांनी थेट डोक्याला हात लावल्याचे देखील बघायला मिळतंय.

मुंबई गर्ल वराच्या शोधात, अटी काय?, भन्नाट जाहिरात व्हायरलं; पण तिचं पॅकेज किती?
Follow us on

लग्न म्हटले की, आजकाल मुलींच्या अपेक्षा खूप जास्त वाढल्या असल्याची ओरड मुलांकडून केली जाते. फक्त नोकरीच नाही तर मुंबई, पुणे अशा शहरांमध्ये मुलाचे स्वत:चे घर असावे ही मोठी अट मुलींकडून ठेवली जातंय. परिणामी अनेक मुलांची लग्न रखडली आहेत. सोशल मीडियाच्या जमाण्यात कधी काय व्हायरल होईल, हे सांगणे फार जास्त कठीण आहे. सोशल मीडियावर काही वेळा लग्नपत्रिका किंवा फोटो नेहमीच व्हायरल होताना दिसतात. आता अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरलीये.

व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये एक फोटो आहे. हा फोटो असा तसा नसून लग्नासाठी मुंबईच्या मुलीने घातलेल्या अटींचा तो फोटो आहे. हेच नाही तर मुंबईतील या मुलीने लग्नासाठी घातलेल्या अटी पाहून अनेकजण हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. मुंबई गर्ल वराच्या शोधात आहे खरी परंतू तिच्या या अटी पूर्ण करणारा वर मिळणे थोडे कठीण असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

वराच्या शोधात असलेली ही मुलगी दहा वर्षांपासून मुंबईमध्ये नोकरी करते. तिला मुंबईतीलच मुलगा हवा आहे. फक्त मुंबईतील मुलगाच नाही तर त्या मुलाचे मुंबईमध्ये स्वत:चे घर असावे. तो मुलगा नोकरदार किंवा बिझनेसवाला असावा ही महत्वाची अट. त्यामध्येही एमबीबीएस डाॅक्टर किंवा सीए असलेल्या प्राधान्य दिले जाणार असल्याचे म्हटले आहे.

हैराण करणारे म्हणजे त्या वराचे वर्षाला कमीत कमी 1 कोटी उत्पन्न असावे. या मुलीचे स्वत: चे वार्षिक पॅकेज मात्र 4 लाख आहे. जर मुलगा परदेशात राहणार असेल तर युरोप किंवा इटली याच ठिकाणी राहणारा असावा. आता या मुलीच्या अटीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. यावर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

एक्सवर अंबर नावाच्या अकाऊंटवरून हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्याचे बघायला मिळतंय. या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, आपल्या देशात 1 कोटी रूपये कमवणाऱ्यांची संख्या 0.01% आहे, त्यामुळे या ताईचे लग्न होणे फारच जास्त कठीण दिसत आहे. दुसऱ्याने लिहिले की, वयाच्या 27 व्या वर्षी ही स्वप्नातील राजकुमार शोधत आहे.