VIDEO | लोकलचा प्रवास करीत असताना तुम्ही सुध्दा बाहेर उभे राहता का ? मग व्हिडीओ पाहा

Mumbai Local : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. एक मुलगी लोकलच्या दरवाज्यात उभे राहून प्रवास करीत आहे. विशेष म्हणजे ही मुलगी एखाद्या डांबाला धडकण्याची शक्यता अधिक आहे.

VIDEO | लोकलचा प्रवास करीत असताना तुम्ही सुध्दा बाहेर उभे राहता का ? मग व्हिडीओ पाहा
Mumbai Local
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 19, 2023 | 3:16 PM

मुंबई : एका ठरावीक वेळेला मुंबईतल्या लोकलला (Mumbai Local Train) गर्दी असते. लोकलची गर्दी टाळण्यासाठी लोकं दुपारी कमी गर्दीच्यावेळी प्रवास करतात. ज्यावेळी खरचं लोकलला गर्दी असते. त्यावेळी लोकं आपला जीव धोक्यात घालून प्रवास करतात असं अनेकदा दिसून आलं आहे. काही प्रवासी असे आहेत की, चालू ट्रेनमध्ये उतरतात आणि पकडतात. अशा पद्धतीने ट्रेन (Local Train news in marathi) पकडत असताना एखाद्यावेळी समजा हात सुटला. तर त्या व्यक्तीला मोठी इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर अनेकदा लोकांची जीव देखील गेला आहे. सध्या एक व्हिडीओ व्हायरल (VIDEO VIRAL) झाला आहे.

एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल

सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी लोकलमधून प्रवास करीत आहे. त्या व्हिडीओमध्ये स्टेशनमधून ती ट्रेन पुढे निघाली आहे. त्यावेळी त्या मुलीचा व्हिडीओ एकाने एकाने शूट केला आहे. त्या मुलीचा एक पाय ट्रेनमध्ये आहे, तर एक पाय बाहेर आहे. त्या मुलीने तिची बॅग पुढच्या बाजूला अडकवली आहे. ती मुलगी तिचा बॅलेन्स करुन उभी आहे. त्याच्या दोन्ही हातांचा फक्त एक छोटासा भाग आत आहे, बाकीचे संपूर्ण शरीर ट्रेनच्या बाहेर आहे. यादरम्यान ती अनेकवेळा विजेच्या खांबाला धडकताना वाचली आहे.

यापुर्वी सुध्दा अनेक व्हिडीओ व्हायरल

मुंबई लोकलमध्ये अशा पध्दतीने बेफिकीर पद्धतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर अशा पद्धतीचे काही व्हिडीओ तुम्हाला मिळतील. मागच्या काही दिवसांपूर्वी एक तरुण जीवघेणा प्रवास करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो तरुण सुध्दा लोकलमध्ये दरवाज्यात लटकून प्रवास करीत होता.

तो तरुण सुध्दा वीजेच्या खांबाला धडकताना थोडक्यात बचावला होता. या व्हिडीओवरती एका व्यक्तीने लिहीले आहे की, मेट्रोसारखे सारखे ट्रेनला सुध्दा दरवाजे असायला हवेत. तसे दरवाजे आल्यानंतर अशा पद्धतीचा प्रवास कायमचा बंद होईल.