दोन चिमुकल्या जीवांचं पंतप्रधानांना भावनिक पत्र; म्हणाल्या प्लीज मोदीजी, माझ्या आई वडिलांना…

Two Children Wrote a Latter To PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन बहिणींचं भावनिक पत्र..; थेट नरेंद्र मोदींना पत्र लिहित व्यक्त केल्या मनातील भावना... म्हणाल्या, माझ्या आई वडिलांना... या मुलींचं पत्र नेमकं काय? त्यांनी या पत्रात काय लिहिलं आहे? वाचा सविस्तर...

दोन चिमुकल्या जीवांचं पंतप्रधानांना भावनिक पत्र; म्हणाल्या प्लीज मोदीजी, माझ्या आई वडिलांना...
Follow us
| Updated on: Feb 27, 2024 | 8:05 PM

जयपूर, राजस्थान | 27 फेब्रुवारी 2024 : लहान मुलांचं भाव विश्व प्रचंड वेगळं असतं. लहान-मोठ्या गोष्टींचा त्यांच्या मनावर परिणाम होत असतो. आई-वडील भावंडं हे त्यांचं भावविश्व असतं. आई-वडिलांशिवाय ही मुलं राहू शकत नाहीत. पण कधी-कधी आई वडिलांच्या नोकरीच्या ठिकाणांमुळे मुलांना आपल्या आई- वडिलांना सोडून राहावं लागतं. पण अशावेळी त्यांचं मन मात्र आपल्या आई-वडिलांजवळ असतं. आई-वडिलांना देखील आपल्या मुलांशिवाय करमत नाही. एकाचा दोन बहिणींची ही गोष्ट… आपल्या आी-वडिलांपासून दूर राहणाऱ्या दोघी बहिणींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित आपल्या मनातील भावना सांगितल्या आहेत.

दोन बहिणींचं पंतप्रधानांना पत्र

ही गोष्ट आहे राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणाऱ्या दोन बहिणींची… 12 वर्षांच्या अर्चिता आणि अर्चना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. आम्ही आमच्या आई वडिलांना खूप मिस करतो. रोज त्यांची आठवण येते. आम्ही आमच्या आई-वडिलांसोबत राहून पुढचं शिक्षण घेऊ इच्छितो. त्यामुळे आमच्या आई-वडिलांची आमच्या गावाजवळ बदली करा, अशी विनंती करणारं पत्र या दोघींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे.

“आम्हाला आई-बाबांसोबत राहायचं आहे”

अर्चिता आणि अर्चना यांची इच्छा आहे की त्यांचे आई- वडील जयपूरला यावेत. इथं राहावं. जेणे करून त्यांना आई- वडिलांसोबत राहता येईल. या दोघी त्यांच्या चुलता आणि चुलतीच्या घरात राहतात. दिल्ली पब्लिक स्कुल बांदीकुई या शाळेत सातवीच्या वर्गात या शिकतात. या दोघींनी आई- वडिलांच्या बदलीसाठी पंतप्रधानांना पक्ष लिहिलं आहे. आमच्या वडिलांचं नाव देवपाल मीना आहे. तर आईचं नाव हेमलता कुमारी मीना आहे. वडील पंचायत समितीचे सहाय्यक लेखाधिकारी आहेत. तर आई राजकीय उच्च माध्यमिक विद्यालय, देवडा ब्लॉक समदडी इथं शिक्षिका आहे. हे दोघे आमच्यापासून बरेच दूर आहेत, असं या पत्रात म्हणण्यात आलं आहे.

“…तर आम्ही आभारी राहू”

आई वडिलांची खूप आठवण येते. त्यामुळे अभ्यासात मन लागत नाही. आमच्या दोघींची इच्छा आहे की, आमच्या आई -वडिलांची बदली जयपूरला व्हावी. जेणे करून आम्ही सगळे सोबत राहू शकू. जर आपण आमच्या आई वडिलांची जयपूरला बदली केली तर आम्ही खूप आभारी राहू, असं पत्र अर्चिता आणि अर्चना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.