Nana Patekar Memes : कालपर्यंत ज्यांच्या डायलॉगवर हसत होतो, आज त्यांचेच सीन पाहून डोळे पाणावले; नानांना चाहत्यांची श्रद्धांजली
क्रांतिवीरमधील प्रताप नारायण तिलक असो किंवा वेलकममधील उदय शेट्टी, नानांनी प्रत्येक भूमिकेत वेगळी छाप सोडली. त्यांच्या जुन्या सीन्सना सोशल मीडियावर पुन्हा शेअर करत चाहते आठवणींना उजाळा देत आहेत.

काही कलाकार असे असतात ज्यांच्या जाण्याने आपला घरातला कोणी तरी गेलाय अशी भावना निर्माण होते. नाना पाटेकर हे त्याचंच एक मूर्तिमंत उहाहरण आहे. त्यांचे फॅन हे फक्त ९० च्या दशकातील लोक नव्हती तर आता अगदी GEN – Z मुलं ही त्यांच्या अभिनयाचे फॅन होते. त्यांचा तो आवाज, हातवारे करण्याची स्टाईल, डायलॉग बोलण्याची पद्धत, त्यांचे एक्सप्रेशन सगळचं अगदी भारावून टाकणारं होतं. हीरो, व्हिलन , कॉमेडी स्टार असा हा नटसम्राट. त्यांच्या अनेक सिनेमांचे क्लिप्स सोशल मीडियात मीम्ससाठी वापरले जायचे. त्यांच्या जाण्याने आता सोशल मीडियावर दुख व्यक्त केल जातं आहे. त्यांचे मीम्स पाहून हसू यायचं पण आता डोळ्यात पाणी साठत आहे.कोणाला क्रांतिवीर मधला प्रताप आठवतोय तर कोणाला वेलकम मधला उदय शेट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून नानांना ट्रिब्युट दिले जात आहे.
क्रांतिवीर मधला त्यांचा तो फेमस डायलॉग आजही ऐकला कि अंगावर काटा येतो. “आ गए मेरी मौत का तमाशा देखने” हा डायलॉग पुन्हा सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. या सिनेमात नानांनी साकरलेला प्रताप नारायण तिलक आजही अनेकांच्या लक्षात आहे. त्यांच्या संवादातला जोश आणि बोलण्यातली धार त्याची छाप आजही लोकांच्या मनावर कायम आहे.
💔 दिग्गज अभिनेता नाना पाटेकर का निधन
75 वर्ष की उम्र में उन्होंने दुनिया को अलविदा कह दिया
भारतीय सिनेमा में उनके शानदार योगदान को हमेशा याद किया जाएगा 🙏ॐ शांति 🕉️🙏
#NanaPatekar https://t.co/ri6ykBFeQV
— 𝐌𝐚𝐧𝐮 𝐆𝐮𝐫𝐣𝐚𝐫 (@ManuGurjar17699) October 8, 2026
जेव्हा हिंदू- मुसलमान यांच्यातील भांडणाचे मुद्दे समोर येत होते.तेव्हा नानांच्या तो डायलॉग तो सीन प्रत्येकाच्या नजरेसमोर आल्याशिवाय राहायचा नाही.क्रांतिवीर या सिनेमातील असलेला जवळपास 32 वर्ष जुना असलेला हा सीन आजही प्रत्येक मुलाला पाठ आहे.
 
ये मुसलमान का खून, ये हिन्दू का खून… बता इसमें मुसलमान का कौन सा, हिन्दू का कौन सा, बता!
बॉलीवुड के दिग्गज अभिनेता नाना पाटेकर की 1994 में बनी फिल्म ‘क्रांतिवीर’ आज भी काफी मशहूर है और हमेशा रहेगा.. #nanapatekardeath #nanapatekar #ripnanapatekar https://t.co/UL7HEqk1Tv— Arun (आज़ाद) Chahal 🇮🇳 (@ArunAzadchahal) October 8, 2026
;
पण नानांना फक्त रागीट भूमिकांसाठी ओळखल जातं अस नाही. वेलकम मधला उदय शेट्टी आठवा! एकीकडे मोठा डॉनचा रूबाब आणि दुसरीकडे चित्र काढण्याची आवड…त्यात मजनू भाईसोबतची जोडी. नानांनी ही भूमिका अशी रंगवली की आजही त्यांचे सीन पाहताना हसू आवरत नाही. आलू ले लो आलू आठवला की नाय डायलॉग.
#RIPNanaPatekar🙏
Nana Patekar received widespread praise for playing a good-hearted gangster Uday Shetty in the comedy Welcome (2007) and its sequel Welcome Back (2015)
Your fav movies of Nana Patekar? https://t.co/OvFwgTp8ij
— Movies N Memories (@BombayBasanti) October 8, 2026
अब तक छप्पन मधला कठोर पोलीस अधिकारी असो किंवा तुम मिलो तो सही मधला तो नानांचा सीन नानांनी प्रत्येक भूमिरकेत आपली छाप सोडली. डायलॉग बोलताना ते पूर्णपणे पात्रात शिरायचे त्यामुळे अनेक पिढ्यांना नाना आपलेसे वाटतात.
You’re living your life happily, then you see something like this and it ruins your mood completely #NanaPatekar https://t.co/zb1GnS7S2G
— Rajkumar Harami (@ItsAnup_) October 8, 2026
आणखी एक डायलॉग सध्या चाहत्यांना आठवतोय हमारे बाद महफिल मे अफसाने बया होंगे …हा ‘तरकीब ‘ चित्रपटातील संवाद. अनेक आठवणी जाग्या करतात. कालपर्यंत त्यांच्या सिनेमातील सीन्स पाहून आपण हसत होतो, त्यांच्या डायलॉगवर मीम्स बनवत होतो. पण आता तेच सीन्स पाहताना सोशल मिडिया यूजर्सचे मन भरून येत आहे
<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”en” dir=”ltr”>You’re living your life happily, then you see something like this and it ruins your mood completely #NanaPatekar https://t.co/zb1GnS7S2G</p>— Rajkumar Harami (@ItsAnup_) <a href=”https://x.com/ItsAnup_/status/2108028291705942377?ref_src=twsrc%5Etfw”>October 8, 2026</a></blockquote> <script async src=”https://platform.x.com/widgets.js” charset=”utf-8″></script>