याला म्हणतात आत्मनिर्भर होणे! व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jun 04, 2023 | 5:42 PM

वर्ष 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा देत लोकांना आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले होते. स्वावलंबन म्हणजे लोक कोणावर अवलंबून न राहता स्वत:चा खर्च स्वत:च करू शकतात, पण काही लोकांनी हा नारा अधिक गांभीर्याने घेतला. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याला म्हणतात आत्मनिर्भर होणे! व्हिडीओ व्हायरल
Atmanirbhar
Follow us on

मुंबई: मोदी सरकार सातत्याने लोकांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. वर्ष 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा देत लोकांना आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले होते. स्वावलंबन म्हणजे लोक कोणावर अवलंबून न राहता स्वत:चा खर्च स्वत:च करू शकतात, पण काही लोकांनी हा नारा अधिक गांभीर्याने घेतला. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की ही आत्मनिर्भरतेची पराकाष्ठा आहे.

खरंतर या व्हिडिओमध्ये एक मुलगा स्वत:हून केस कापताना दिसत आहे आणि तेही परफेक्ट पद्धतीने. सहसा अशा गोष्टी दिसत नाहीत. केस कापणे किती अवघड आहे हे तुम्हाला माहित असेलच. हे शिकण्यासाठी बार्बरही खूप वेळ घेतात, पण त्यांच्यातही स्वत:हून केस कापण्याची क्षमता नसते, पण असंच काहीसं या व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलगा खुर्चीवर बसून कात्री आणि कंगव्याचा वापर करून सहजपणे केस कापत आहे. केस कापतानाही त्याचे हात इतक्या वेगाने फिरत असतात, जणू तो दुसऱ्याचे केस कापत असतो. ही खरोखरच अनोखी प्रतिभा आहे. अशी प्रतिभा पुन्हा पुन्हा दिसून येत नाही.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. @HasnaZarooriHai नावाच्या आयडीसोबत शेअर करण्यात आले असून त्यावर मजेशीर पद्धतीने कॅप्शन लिहिले आहे, “अशा पद्धतीनं आत्मनिर्भर व्हायचंय!”. अवघ्या 58 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 36 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 2 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक देखील केले आहे.

त्याचबरोबर लोकांनी विविध मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘हीच खरी आत्मनिर्भरता आहे’, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ‘काय टॅलेंट आहे’. त्याचप्रमाणे एका युजरने मजेशीर स्वरात लिहिले आहे की, ‘जर मी हे कौशल्य शिकले तर मी दरवर्षी 1 हजार रुपये वाचवू शकतो’.