Eknath Khadse Kirit Somaiya Video: राऊतांचा फोटो समोर आला अन् खडसेंना बच्चनचं गाणं आठवलं, सोमय्या काय म्हणाले?

| Updated on: Apr 14, 2022 | 1:26 PM

किचन कल्लाकार या कार्यक्रमात संजय राऊतांचा फोटो दाखवण्यात आला तेव्हा एकनाथ खडसे यांनी महानायक अमिताभ बच्चन यांचं 'आ देखे जरा, किसमे कितना है दम' हे गाणं गायलं. तर सोमय्या काय म्हणाले?

Eknath Khadse Kirit Somaiya Video: राऊतांचा फोटो समोर आला अन् खडसेंना बच्चनचं गाणं आठवलं, सोमय्या काय म्हणाले?
एकनाथ खडसे, संजय राऊत, किरीट सोमय्या
Follow us on

मुंबई : झी मराठीवरील (Zee marathi) किचन कल्लाकार (Kitchen Kallakar) या कार्यक्रमात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) हे जुने सहकारी आणि मित्र एकत्र आले. या कार्यक्रमात गप्पांसह विनोदही होत असतात. यात राजकीय मंडळींना गोत्यात आणणारे प्रश्नही विचारले जातात. या कार्यक्रमादरम्यान काही फोटो दाखवून त्या फोटोला पाहून मनात येणारं गाणं सांगायचं होतं. यात संजय राऊतांचा फोटो दाखवण्यात आला तेव्हा एकनाथ खडसे यांनी महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांचं ‘आ देखे जरा, किसमे कितना है दम’ हे गाणं गायलं. तर या फोटोवर निवेदक संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) याने किरीट सोमय्या यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी थेट हातात फडकं घेत किचन पुसायला सुरूवात केली आणि म्हणाले, “मी साफसफाईला सुरूवात करतो!”, सोमय्या असं म्हणाले अन् एकच हश्या पिकला.

एकनाथ खडसेंनी गायलं गाणं

झी मराठीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमात विविध क्षेत्रातली मंडळी येत असतात. नुकतंच या मंचावर एकनाथ खडसे आले होते. इथे काही राजकीय मंडळींचे फोटो दाखवण्यात आले तेव्हा त्यावर खडसेंनी आपली प्रतिक्रिया दिली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा फोटो दाखवण्यात आला तेव्हा खडसेंनी ‘आ देखे जरा, किसमे कितना है दम’हे गाणं गायलं.

सोमय्या काय म्हणाले?

राऊतांच्या फोटोवर सोमय्यांची प्रतिक्रिया विचारली गेली तेव्हा त्यांनी हातात फडकं घेत “मी साफसफाईला सुरूवात करतो!”, असं म्हटलं. त्यावर सगळेच हसू लागले.

सोमय्यांसाबोत खडसेंनी गायली गाणी

या कार्यक्रमात एकाथ खडसे आणि किरीट सोमय्या या दोघांच्या दोस्तीबद्दल सांगताना एकत्र ये दोस्ती हम नहीं तोडेंग गाणं गाताना दिसून आले. तर किरीट सोमय्या यांना खडसे यावेळी सल्ले देतानाही दिसून आले. मी सोमय्यांना नेहमी जपून राहण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला देत असतो, असे यावेळी खडसे म्हणाले. मला त्यांना सल्ला द्याचा अधिकार आहे. ते कधी जात्यात असतात तर कधी सुपात असता, त्यामुळे त्यांनी काळजी घ्यावी, असे खडसे म्हणाले. तसेच आमची दोस्ती ही पस्तीस वर्षांची आहे, असेही खडसेंनी आवर्जून सांगितले. दीड वर्षांनंतर आम्ही पहिल्यांदाच व्यासपीठावर भेटलो, असेही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

“तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही, माफ करा बाबासाहेब!”, हेमांगी कवीची फेसबुक पोस्ट चर्चेत

Video : हात नसताना तरूण बनवतोय नूडल्स, नेटकरी म्हणतात, “बेस्ट कुक इन द वर्ल्ड!”

सातवीत असताना गरदोर, 14 व्या वर्षी बनली आई! आता स्वतःच मुलीला सांगितला गरोदर होण्यामागचा किस्सा