नेस्लेनं किटकॅट चॉकलेटवर लावला भगवान जगन्नाथाचा फोटो, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया

| Updated on: Jan 21, 2022 | 6:52 AM

लोकांचं टार्गेट नेस्ले (Nestle) कंपनी आहे. नेस्लेनं किटकॅट (Kitkat) चॉकलेटवर भगवान जगन्नाथाचं चित्र लावलं आहे. जेव्हा ही बातमी समोर आली आहे, तेव्हापासून सोशल मीडियावर यावरून वाद सुरू झाला आहे.

नेस्लेनं किटकॅट चॉकलेटवर लावला भगवान जगन्नाथाचा फोटो, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया
नेस्ले किटकॅट
Follow us on

सोशल मीडिया(Social Media)वर नेहमीच कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून चर्चा सुरू असते. कधी काही गोष्टींची प्रशंसा, तर कधी टीकाही. लोक त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करत असतात. आता याच प्रकारचा एक वाद निर्माण झालाय. लोकांचं टार्गेट नेस्ले (Nestle) कंपनी आहे. नेस्लेनं किटकॅट (Kitkat) चॉकलेटवर भगवान जगन्नाथाचं चित्र लावलं आहे. जेव्हा ही बातमी समोर आली आहे, तेव्हापासून सोशल मीडियावर यावरून वाद सुरू झाला आहे, तर लोक चांगलेच संतापलेले दिसत आहेत. सोशल मीडिया यूझर्सचा पारा चढला आहे आणि म्हणूनच #nestle, #KitKat ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

‘प्रमोशनसाठी फोटो वापरणं चुकीचं’

कंपनीनं प्रमोशनसाठी चॉकलेटच्या रॅपरवर भगवान जगन्नाथाचं चित्र लावलं होतं. हे पाहून लोकांची मोठी निराशा झाली. यावेळी लोकांनी सांगितलं, की अशा जाहिरातींमुळे त्यांच्या भावना दुखावल्या जातात. अहवालानुसार, कंपनीनं गेल्या वर्षी आपल्या चॉकलेट रॅपरवर भगवान जगन्नाथ, माता सुभद्रा आणि बलभद्र यांचे फोटो वापरले होते. त्यानंतर लोकांनी हे चित्र रॅपरवरून हटवण्याची मागणी केली.

‘कोणालाही दुखावण्याचा नव्हता’

लोक म्हणतात, की चॉकलेट खाल्ल्यानंतर लोक रॅपर डस्टबिन किंवा रस्त्यावर टाकतात. तो देवाचा अपमान होईल. हे प्रकरण तापल्यानंतर कंपनीनंही त्यावर स्पष्टीकरण दिलं. आमचा हेतू कोणालाही दुखावण्याचा नव्हता आणि नाही, असं कंपनीचं म्हणणं आहे. या वादानंतर संबंधित रॅपर बाजारातून काढून घेण्यास सुरुवात केली असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या प्रकरणावर लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, पाहू या…

जोरदार वाऱ्यानं वाळूला आला ‘असा’ आकार, सोशल मीडियावर Photos व्हायरल

‘ये तो सुपर से भी उपर निकला’, Viral Videoतून दिसेल माकडानं कसं सोडवलं चुकटीसरशी कोडं!

Anand Mahindra Tweet : आनंद महिंद्रा यांना आपल्या बोलण्यानं आश्चर्यचकित करणारा हा मुलगा आहे तरी कोण?