‘ये तो सुपर से भी उपर निकला’, Viral Videoतून दिसेल माकडानं कसं सोडवलं चुकटीसरशी कोडं!

‘ये तो सुपर से भी उपर निकला’, Viral Videoतून दिसेल माकडानं कसं सोडवलं चुकटीसरशी कोडं!
माकड

सध्या सोशल मीडिया(Social Media)च्या विश्वात माकडांशी संबंधित असा एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होतोय, ज्यामध्ये त्यांची बुद्धी पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

प्रदीप गरड

|

Jan 20, 2022 | 3:34 PM

असं म्हणतात, की माणूस एकेकाळी माकड (Monkey) होता. नंतर हळूहळू त्याचाही विकास होत गेला आणि पुढे ही माकडं मानव बनली. याच कारणामुळे माकडांना मानवाचं पूर्वज म्हटलं जातं. ही माकडं कधी कधी असं कृत्य करतात, त्यावरून अंदाज बांधता येतो, की ते आपले पूर्वज असावेत. मात्र, अनेकांना हे मान्य नाही. हा वेगळा विषय आहे, त्यावर पुन्हा कधीतरी चर्चा होईल. सध्या सोशल मीडिया(Social Media)च्या विश्वात माकडांशी संबंधित असा एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होतोय, ज्यामध्ये त्यांची बुद्धी पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. व्हिडिओमध्ये माकड माणसाप्रमाणेच एक कोडं अगदी सहजपणे फोडतो.

मजेदार हावभाव

व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये जंगलात लोखंडी दरवाजासारखं पझल गेम आहे. त्याचवेळी त्याच्या आजूबाजूला अनेक माकडं दिसतात. या लोखंडी दरवाजावर एक माकड काहीतरी करताना दिसत आहे. पुढच्याच क्षणी तुम्हाला समजेल की दारात कोड्यासारखं काहीतरी आहे. ज्यातून चेंडू काढावा लागतो. व्हिडिओमध्ये, माकड ज्या पद्धतीनं बॉल सहजपणे सोडवू शकतो आणि बाहेर काढू शकतो, ते पाहताना तुम्हाला खूप मजेदार वाटेल. चला तर मग पाहू या, हा मजेदार व्हिडिओ…

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर monkeyvidz नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला. यूझरनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, की ‘व्वा, हे खूप स्मार्ट आहे.’ 17 जानेवारी रोजी अपलोड केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. आतापर्यंत 18 हजारांहून अधिक लोकांनी याला लाइक केलं आहे. ही संख्या सातत्यानं वाढत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूझर्सना आश्चर्य वाटतंय आणि तो ते पुन्हा पुन्हा बघत आहेत.

‘ये तो सुपर से ऊपर इंटेलीजेंट निकला.’

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूझर्सनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिलीय. एका यूझरनं कमेंट करत लिहिलंय, की हे सुपर इंटेलिजेंट निघालं.’ त्याचवेळी दुसऱ्या यूझरनं कमेंट करत लिहिलंय, की ‘इस बंदर ने कितनी आसानी से इस पहली को सॉल्व कर लिया. मुझे इस पर बहुत प्यार आ रहा है.’ याशिवाय, बहुतेक यूझर्स ‘ओह माय गॉड’ आणि स्मार्ट माकड म्हणत व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत.

Anand Mahindra Tweet : आनंद महिंद्रा यांना आपल्या बोलण्यानं आश्चर्यचकित करणारा हा मुलगा आहे तरी कोण?

Viral Video : आजोबांचा बूस्टर डोस..! मारला असा काही जबरदस्त शॉट, यूझर्स म्हणाले…

Viral : नूडल्सपासून महिला विणतेय स्वेटर, सहा लाखांहून अधिक यूझर्सनी पाहिलाय ‘हा’ Video

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें