Viral Video : आजोबांचा बूस्टर डोस..! मारला असा काही जबरदस्त शॉट, यूझर्स म्हणाले…

Viral Video : आजोबांचा बूस्टर डोस..! मारला असा काही जबरदस्त शॉट, यूझर्स म्हणाले...
क्रिकेट खेळणाऱ्या आजोबांचा उत्साह

धोतर कुर्ता घालून कधी क्रिकेट (Cricket) खेळला आहात का? किंवा एखाद्या वृद्ध व्यक्तीला अशा पेहेरावात क्रिकेट खेळताना पाहिलं आहे का? जर तुम्ही पाहिलं नसेल तर हा व्हिडिओ (Video) तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)वर शेअर केला जातोय.

प्रदीप गरड

|

Jan 20, 2022 | 2:39 PM

धोतर कुर्ता घालून कधी क्रिकेट (Cricket) खेळला आहात का? किंवा एखाद्या वृद्ध व्यक्तीला तुम्ही अशा पेहेरावात कधी क्रिकेट खेळताना पाहिलं आहे का? जर तुम्ही पाहिलं नसेल तर हा व्हिडिओ (Video) तुमच्यासाठी आहे. होय, हा व्हिडिओ सोशल मीडिया(Social Media)च्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जातोय. प्रत्यक्षात हा व्हिडिओ कधी आणि कुठे चित्रित करण्यात आला याची माहिती नाही. मात्र ही क्लिप पाहिल्यानंतर लोक वृद्ध व्यक्तीच्या उत्साह आणि जोशाचं कौतुक करत आहेत. त्याच वेळी, काहींनी व्हिडिओला मजेशीरपणे कॅप्शनदेखील दिलं आहे. बूस्टर डोस दिल्यानंतर… तुम्हाला काय वाटतं?

उपस्थित लोकांच्या चेहऱ्यावर अनोखेच भाव

या व्हिडिओमध्ये धोतर कुर्ता घातलेला एक वृद्ध बॅटिंग करताना दिसत आहे. झाडाची विकेट बनवण्यात आली आहे. जवळच दुचाकी उभ्या आहेत, त्यावर काही तरूण बसले आहेत. चेंडू टाकताच ते एक जबरदस्त शॉट मारतात आणि एका धावेसाठी आकर्षक शैलीत धावतात. त्यांचा उत्साह आणि क्रिकेट खेळण्याची शैली पाहून उपस्थित लोकांच्या चेहऱ्यावर अनोखेच भाव फुलले. आम्हाला खात्री आहे, तुम्हीही हा व्हिडिओ मजेत पाहत आहात!

ट्विटरवर शेअर

ही क्लिप आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी 19 जानेवारीला ट्विट केली होती. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, की ताऊ का क्रिकेट जोश… विराट कोहली से प्रेरित (motivated)… या क्लिपला 22 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि सुमारे 1500पेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत.

‘दिल तो बच्चा है जी’

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूझर्सनी त्यांच्या प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. काहींनी दिल तो बच्चा है जी, असं लिहिलं. काहींनी म्हटलं, की ते त्यांच्या काळात एक अद्भुत खेळाडू असावे.

Viral : ‘एवढ्या’ कॅलरीज् अन्न एकटा खातो ‘हा’ सर्वात ताकदवान व्यक्ती! बायकोनं सांगितलं सिक्रेट!!

Viral : नूडल्सपासून महिला विणतेय स्वेटर, सहा लाखांहून अधिक यूझर्सनी पाहिलाय ‘हा’ Video

Video : चुकीला माफी नाही..! स्कूटीवर स्टंट करणं तरुणीला पडलं भारी; अशी काही आपटली, की…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें