Viral : ‘एवढ्या’ कॅलरीज् अन्न एकटा खातो ‘हा’ सर्वात ताकदवान व्यक्ती! बायकोनं सांगितलं सिक्रेट!!

Viral : 'एवढ्या' कॅलरीज् अन्न एकटा खातो 'हा' सर्वात ताकदवान व्यक्ती! बायकोनं सांगितलं सिक्रेट!!
एडवर्ड स्टीफन हॉल

ब्रिटीश बॉक्सर एडवर्ड स्टीफन हॉल(Edward Stephen Hall)ला 'जगातील सर्वात शक्तिशाली माणूस' म्हणून ओळखलं जातं. एडवर्डने 2017मध्ये 'वर्ल्ड्स स्ट्राँगेस्ट मॅन' (Worlds Strongest Man) स्पर्धा जिंकली. या यशामागं त्यांची पत्नी अलेक्झांड्रा हॉल(Alexandra Hall)चा खूप महत्त्वाचा वाटा आहे.

प्रदीप गरड

|

Jan 20, 2022 | 1:22 PM

ब्रिटीश बॉक्सर एडवर्ड स्टीफन हॉल(Edward Stephen Hall)ला ‘जगातील सर्वात शक्तिशाली माणूस’ म्हणून ओळखलं जातं. एडवर्डने 2017मध्ये ‘वर्ल्ड्स स्ट्राँगेस्ट मॅन’ (Worlds Strongest Man) स्पर्धा जिंकली. याशिवाय त्याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेतेपदही पटकावली आहेत. या यशामागं त्यांची पत्नी अलेक्झांड्रा हॉल(Alexandra Hall)चा खूप महत्त्वाचा वाटा आहे.

अलेक्झांड्राची सर्वात मोठी भूमिका

2012मध्ये लग्नगाठ बांधल्यापासून अलेक्झांड्रा बॉक्सर पती एडवर्डच्या आहाराची काळजी घेते. ‘स्टोक ऑन ट्रेंट लाइव्ह’च्या रिपोर्टनुसार, एडवर्डनं काय खावं, किती खावं आणि केव्हा खावं, यात अलेक्झांड्राची सर्वात मोठी भूमिका असते.

बॉडी बनवायला बायकोनं केली मदत

34 वर्षीय बॉडीबिल्डर बॉक्सर एडवर्डला दररोज 7,000 कॅलरीजची गरज असते. ती पूर्ण करण्यासाठी योग्य आहार पुरवण्याचं काम अलेक्झांड्रानं हाती घेतलं आहे. अलेक्झांड्रा 6 मील अ डे डाएट प्लॅन फॉलो करते. म्हणजेच, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण इत्यादीमध्ये फक्त निवडक गोष्टी असतील. कार्बोहायड्रेट, प्रथिनं आणि भाज्यांवर त्यांचं लक्ष आहे. अलेक्झांड्रादेखील स्वतःहून पदार्थ बनवते.

अलेक्झांड्रा बनवते जेवण

एडवर्डचा दैनंदिन आहार सामान्य माणसांपेक्षा जवळपास चौपट आहे. तरीही, अलेक्झांड्रा हे खूप चांगलं करतं, जेणेकरून रिंगमधील तिच्या पतीच्या कामगिरीवर परिणाम होऊ नये. तिला स्वयंपाक करून नवऱ्याला खायला घालायला काहीच अडचण नाही.

Alexandra Hall

अलेक्झांड्रा हॉल, एडवर्ड स्टीफन हॉल

चरबी कमी करायचीय

एका वृत्तपत्राशी बोलताना अलेक्झांड्रा म्हणाली, की एडवर्डचा आहार तो काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे यावर अवलंबून आहे. सध्या, तो चरबी कमी करण्याचा आणि मसल्स टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तो दररोज सुमारे 7,000 कॅलरीज मिळतील असा आहार घेत आहे.

पुन्हा रिंगमध्ये प्रवेश करणार एडवर्ड

एडवर्डला या वर्षाच्या अखेरीस पुन्हा रिंगमध्ये प्रवेश करायचा आहे. त्याला “इतिहासातली सर्वात हेवीवेट बॉक्सिंग मॅच” असं वर्णन केलं जात असलेल्या थोर ब्योर्नसन(Thor Bjornsson)शी लढायचे आहे. एडवर्डला ‘द बीस्ट’ (The Beast) म्हणून ओळखलं जातं, तर ब्योर्नसनही कमी नाही.

एडवर्डकडे मालमत्ता किती? 888 स्पोर्ट्सनुसार, एडवर्डची एकूण संपत्ती £3.67 दशलक्ष (37 कोटी)च्या जवळपास आहे. एका अहवालानुसार, एडवर्ड प्रत्येक ‘स्ट्राँगमॅन कॉन्टेस्ट’मध्ये £80,000 ते £100,000 (80 लाख) कमावतो. यासोबतच अतिरिक्त बक्षीसही त्याच्या खात्यात जातं. एडवर्डची सोशल मीडियावरही जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

Viral : नूडल्सपासून महिला विणतेय स्वेटर, सहा लाखांहून अधिक यूझर्सनी पाहिलाय ‘हा’ Video

Viral Video : ‘ऑस्प्रे’ची पाण्यात घुसून शिकार, पण एका चुकीमुळे सर्व मेहनत गेली वाया

Video : Pushpaच्या अल्लू अर्जुनचा ‘असा’ही फॅन…. अप्रतिम डान्स करून जिंकलं नेटकऱ्यांचं मन

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें