AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोट्यवधींची संपत्ती तरीही रस्त्यावर कपडे धुतोय हा अभिनेता, व्हिडीओ पाहून तुम्ही…

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हा अभिनेत्या रस्त्याच्या शेजारी कपडे धुताना दिसत आहे.

कोट्यवधींची संपत्ती तरीही रस्त्यावर कपडे धुतोय हा अभिनेता, व्हिडीओ पाहून तुम्ही...
बॉलिवूड अभिनेताImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 22, 2026 | 11:46 AM
Share

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत ज्यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत. मिळणारे चित्रपट तसेच जाहिराती यामधून कलाकार प्रचंड पैसे कमावतात. पण कधीकधी कलाकारांवर वाईट दिवसपण येतात. त्यांचे दिवस पलटून ते कधी रस्त्यावर येतील हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका बॉलिवूड अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता रस्त्याच्या शेजारी कपडे धुताना दिसत आहे. आता हा अभिनेता कोण आहे? जाणून घेऊया…

आम्ही ज्या अभिनेत्याविषयी बोलत आहेत तो बॉलिवूडचा प्रसिद्ध स्टार आणि कॉमेडियन सुनील ग्रोवर आहे. कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये आपल्या भूमीकेमुळे लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या सुनील ग्रोवरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील आपल्या साध्या जीवनशैलीने लोकांची मने जिंकली आहेत. अलीकडेच त्याने सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ शेअर केला आहे, जो चर्चेत आहे.

नेमका काय आहे व्हिडीओ?

व्हिडीओमध्ये सुनील ग्रोवरचा साधेपणा दिसत आहे. तो रस्त्याच्या शेजारी हँडपंपजवळ आपले कापडे धुताना दिसत आहे. दरम्यान, सुनीलने फिकट गुलाबी रंगाचा टीशर्ट आणि काळ्या रंगाची स्पोर्ट्स पँट परिधान केली आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की सुनील ग्रोवरने एका बादलीमध्ये कपडे ठेवले आहेत. हँडपंपने पाणी काढून सुनील त्या बादलीतील कपडे धुताना दिसत आहे. कपडे धुवून झाल्यानंतर सुनील ग्रोवर तोंड-हातपाय धुत आहे. हा व्हिडीओ सुनील ग्रोवरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी सुनील ग्रोवरच्या साधेपणाचे कौतुक केले आहे.

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

सुनीलने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताना कोणतेही कॅप्शन दिलेले नाही. पण व्हिडीओच्या बँकग्राऊंडला 1962 सालच्या ‘बात एक रात की’ चित्रटातील “ना तुम हमें जानो” हे गाणे लावले आहे. सोशल मीडिया सुनील ग्रोवरचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. युजर्सने त्याच्या साधेपणाची प्रशंसा केली आहे. अनेकांनी कमेंट केली की, मोठा स्टार असूनही जमिनीशी जोडलेला राहणे आणि असा साधेपणा दाखवणे हे त्यांना सर्वात वेगळे बनवते. या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये एक पाकिस्तानी फॅनने लिहिले, “भाई क्या चीज हो यार आप… लव फ्रॉम पाकिस्तान.”

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद