AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना कोणाची? आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी, आतापर्यंत काय घडलं?

मोठी बातमी समोर येत आहे, आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेचं चिन्ह आणि पक्षाचं नाव कोणाचं? यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल हेच युक्तिवाद करणार आहेत.

शिवसेना कोणाची? आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी, आतापर्यंत काय घडलं?
आज पुन्हा सुनावणी Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 13, 2026 | 8:02 AM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं?  यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. गेल्या तीन ते चार सुनावणींमध्ये शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल हेच युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडणार? शिवसेना ठाकरे गटाची बाजू मंडताना कपिल सिब्बल नेमका काय युक्तिवाद करणार? याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली होती, पक्षाचे दोन गट पडले, एक शिवसेना शिंदे गट आणि दुसरा शिवसेना ठाकरे गट, दरम्यान त्यानंतर शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह नेमकं कोणाचं असा प्रश्न निर्माण झाला, यावर शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव शिवसेना शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली. या प्रकरणावर आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

आतापर्यंत  काय घडलं?

गेल्या दोन ते तीन सुनावणीपासून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे सुप्रीम कोर्टात शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. बुधवारी देखील सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. एकनाथ शिंदे यांना त्यावेळी फक्त आमदारांच्या संख्याबळावर मुख्यमंत्रिपद देण्यात आलं, मुख्यमंत्रिपद देताना सत्य काय ते तपासण्यात आलं नाही, एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड बेकायदेशीर होती, असा युक्तिवाद बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी केला आहे.

दरम्यान बुधवारी बोलताना कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर देखील जोरदार हल्लाबोल केला होता. 1999 च्या घटनेमध्ये पक्षप्रमुखपद नव्हत, हे यांना 2026 ला कळालं का? असा सवाल यावेळी कपिल सिब्बल यांंनी उपस्थित केला आहे.  तसेच निवडणूक आयोग स्वत:च्या सोईनुसार निर्णय घेतं, असंही यावेळी कपिल सिब्बल यांनी म्हटलं.

Follow Us
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी...
भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पांचे दर्शन, पहा खास व्हिडीओ
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट
राज ठाकरेंच्या एका पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट; भाजपचा पलटवार!
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, ड्रोन...
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले; आंदोलकांचीही मोठी गर्दी, पाहा ड्रोन दृश्य...
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुर
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांसाठी 25 हजारांची मागणी
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले...
मनोज जरांगे पाटील चर्चेला आले तर सरकार सामोरे जाणार; भरत गोगावले यांचे मोठे विधान
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन