Video : Pushpaच्या अल्लू अर्जुनचा ‘असा’ही फॅन…. अप्रतिम डान्स करून जिंकलं नेटकऱ्यांचं मन

Video : Pushpaच्या अल्लू अर्जुनचा 'असा'ही फॅन.... अप्रतिम डान्स करून जिंकलं नेटकऱ्यांचं मन
डान्स करणारा कोंबडा

'पुष्पा : द राइज' (Pushpa : The Rise) चित्रपटातल्या डान्स स्टेप्सशी संबंधित अनेक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच प्रकारामध्ये कोंबडीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

प्रदीप गरड

|

Jan 20, 2022 | 10:55 AM

साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांचा ‘पुष्पा : द राइज’ (Pushpa : The Rise) चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. चाहत्यांना हा चित्रपट जसा आवडला तसंच त्यातील गाण्यांनाही पसंती दिली जातेय. त्याचे डायलॉग्स आणि डान्स स्टेप्सशी संबंधित अनेक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच प्रकारामध्ये कोंबडीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो चित्रपटातल्या ‘श्रीवल्ली…’ या गाण्याच्या डान्स स्टेप्स कॉपी करत आहे.

कोंबडा आहे काही खास

कोंबडीचं नाव घेताच कुकड कु… असा आवाज येऊ लागतो. कोंबडा इतका खास आहे, की सर्वांनाच तो आवडतो. आता व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ घ्या, ज्यामध्ये ‘पुष्पा : द राइज’ चित्रपटातल्या ‘तेरी झलक.. श्रीवल्ली…’ या गाण्यावर कोंबडा नाचत आहे.

‘श्रीवल्ली’वर डान्स

व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक कोंबडा अंगणात मस्तीच्या मूडमध्ये आहे आणि नंतर अचानक तो ‘श्रीवल्ली’ या ‘पुष्पा’तल्या गाण्याचा नायक अल्लू अर्जुननं केलेल्या स्टेप्स करताना दिसत आहे. त्याच्या डान्स स्टेप्स पाहून असं दिसतं, की तो साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचाही जबरदस्त चाहता आहे.

अल्लू अर्जुनची कॉपी

सोशल मीडियावर यूझर्सना कोंबड्याचा हा डान्स खूप आवडला आहे. एका यूझरनं लिहिलंय, की ‘भाई डांस देख रहे हो इन जनाब का एक दम साउथ इंडस्ट्री के सुपरस्टार अल्लू अर्जुन की कॉपी है ये तो.’ दुसऱ्या यूझरनं लिहिलंय, की ‘या व्हिडिओनं माझा दिवस चांगला बनवला.’

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ Instagramवर comedynation.teb नावाच्या अकाऊंटद्वारे शेअर केला गेला आहे, परंतु यूझर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरदेखील जोरदारपणे तो शेअर करत आहेत. व्हिडिओवर एकामागून एक कमेंट्सही केल्या जात आहेत.

Video : चुकीला माफी नाही..! स्कूटीवर स्टंट करणं तरुणीला पडलं भारी; अशी काही आपटली, की…

सोशल मीडियाबद्दल काहीच माहिती नाही, तरीही मलावीयन संगीतकार टिकटॉकवर सुपरहिट, 80 लाखांहुन अधिक जणांनी पाहिले व्हिडीओ

Video | सेल्फीसाठी जीव धोक्यात! नदीत बुडत असलेल्या गाडीवर उभा राहून महिलेने घेतला सेल्फी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें