AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल मीडियाबद्दल काहीच माहिती नाही, तरीही मलावीयन संगीतकार टिकटॉकवर सुपरहिट, 80 लाखांहुन अधिक जणांनी पाहिले व्हिडीओ

92 वर्षीय चालमांडा हे दक्षिणी मालावीच्या चिराडझुलू परिसरातील माडझुवा गावात राहातात. त्यांना सोशल मीडियाबद्दल फारसे काही माहित नाही. मात्र तरी देखील त्यांचे संगीत टिकटॉक सारख्या समाज माध्यमांवर प्रचंड लोकप्रिय आहे.

सोशल मीडियाबद्दल काहीच माहिती नाही, तरीही मलावीयन संगीतकार टिकटॉकवर सुपरहिट, 80 लाखांहुन अधिक जणांनी पाहिले व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 12:34 AM
Share

आजच्या युगामध्ये एखाद्या व्यक्तीला जर सोशल मीडिया (Social Media) म्हणजे काय? त्याचा वापर कसा करतात किंवा स्मार्ट फोन म्हणजे काय हे माहिती नाही असे म्हणणे जरा अतिशयोक्ती ठरेल. मात्र आजही असे अनेक लोक आहेत, ज्यांचा अजून सोशल मीडियाशी संबंध आलेला नाही. यातील एक आहेत मलावीयन संगीतकार गिड्डेस चालमांडा (Giddes Chalmanda) 92 वर्षीय चालमांडा हे दक्षिणी मालावीच्या चिराडझुलू परिसरातील माडझुवा गावात राहातात. त्यांना सोशल मीडियाबद्दल फारसे काही माहित नाही. मात्र तरी देखील त्यांचे संगीत टिकटॉक सारख्या समाज माध्यमांवर प्रचंड लोकप्रिय आहे. त्यांचे व्हिडीओ आतापर्यंत जवळपास 80 लाखांहुन अधिक जणांनी पाहिले आहेत. चालमांडा हे बँजो वाजवतात. त्यांचे हे मलावीयन संगीत जगभरात पोहोचविण्यामध्ये सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे.

सोशल मीडियामुळे संगीत जगभरात पोहोचले

याबाबत बोलताना चालमांडा सांगतात की, माझे वय सध्या 92 वर्षांचे आहे, मी बँजो वाजवतो. मी जेव्हा बँजो वाजवत असतो, तेव्हा ते संगीत ऐकण्यासाठी माझे मित्र आणि नातेवाईक इथे येतात. त्यातील अनेकजण त्याचे चित्रिकरण करतात. व तो व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करतात. माझ्या व्हिडीओंना सोशल मीडियावर चांगली पसंती मिळत असल्याचे माझ्या नातेवाईकांनीच मला सांगितले. त्यानंतर माझा उत्साह आणखी वाढला. माझे संगीत सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात पोहोचत असल्याचे समाधान वाटत आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले.

गेल्या वर्षी टिकटॉकवर एन्ट्री

दरम्यान चालमांडा यांनी गेल्या वर्षी टिकटॉकवर एन्ट्री केली. त्यांच्या नातवाने त्यांच्या संगिताचे काही व्हिडीओ चित्रित केले. त्यानंतर त्याने हे व्हिडीओ टिकटॉकवर टाकले. हे व्हिडीओ लोकांच्या पसंतीस उतरले. लोक मलावीयन संगित आवडीने ऐकू लागले. अवघ्या वर्षभरातच चालमंडा यांचे व्हिडीओ 80 लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिले आहेत. याबाबत बोलताना त्यांचा नातू म्हणाला की मी देवाचे आभार मानतो की, माला असे आजोबा मिळाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून अवघ जग आज त्यांचे संगीत ऐकत आहे.

संबंधित बातम्या

लहान मुलांच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवल्याचा आरोप; केंद्र सरकारकडून चॅनलला नोटीस

Pune Kidnapping Case Balewadi : सिद्धार्थ जाधवचीही डूग्गू परतल्यानंतर पोस्ट…पुणे पोलिसांचे आभार मानत म्हणाला…

Video | सेल्फीसाठी जीव धोक्यात! नदीत बुडत असलेल्या गाडीवर उभा राहून महिलेने घेतला सेल्फी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.