Pune Kidnapping Case Balewadi : सिद्धार्थ जाधवचीही डूग्गू परतल्यानंतर पोस्ट…पुणे पोलिसांचे आभार मानत म्हणाला…

Pune Kidnapping Case Balewadi : सिद्धार्थ जाधवचीही डूग्गू परतल्यानंतर पोस्ट...पुणे पोलिसांचे आभार मानत म्हणाला...
सिद्धार्थ जाधवचे डूग्गूबद्दल ट्विट

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवलाही (Siddharth Jadhav) पुणे पोलिसांचे कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनेही पुणे पोलिसांचे कौतुक करत एक पोस्ट केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 19, 2022 | 10:40 PM

पुणे : गेल्या दहा दिवसांपासून पुण्यातला डूग्गू(Duggu) म्हणजेच स्वर्णव चव्हाण (Swarnav chavan) अपहरकरत्यांच्या ताब्यात होता. अवघ्या चार वर्षाचं पोरगं तब्बल दहा दिवसांनंतर आई-बापाच्या कुशीत परतल्यावर सगळ्या महाराष्ट्रला हेवा वाटला. यावरच सोशल मीडियावर लोक व्यक्त होत आहेत. सर्व पुणे पोलिसांचे कौतुक होत आहे, आता मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवलाही (Siddharth Jadhav) पुणे पोलिसांचे कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनेही पुणे पोलिसांचे कौतुक करत एक पोस्ट केली आहे. फक्त सिद्धार्थच नाही तर सध्या सोशल मीडियावर डूग्गू बद्दल अनेकजण व्यक्त होतं आहेत. सिद्धार्थ जाधवने पोस्ट करत म्हटले आहे की, अभिनंदन पुणे पोलीस कमिशनर अमिताभ गुप्ता सर आणि पुणे पोलीस…मनापासून आभार-एक बाप…त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे सवाल

काहींनी पुणे पोलिसांचे अभिनंदन करताना, गूड वर्क टीम, असे लिहले आहे, तर एकाने ही सर्वात आनंदाची बातमी आहे, असे लिहिले आहे. एकाने अपहरण करणारा सापडला ना? असा सवालही केला आहे. ह्यामागचा सूत्रधार कोण आहे? ह्याची माहिती पुणेकरांना मिळाली पाहिजे!! चायना व्हायरसचा ताण असून पण बऱ्याच नेटिझन्स ने ऑनलाइन प्रयत्न सुरू ठेऊन प्रकरण थंड होणार नाही याची काळजी घेतली, नाहीतर गरीब सामान्य माणसाचे प्रकरण दोन दिवसात कसे गार होते हे आम्हाला माहिती आहे…अशा आशयाच्या कमेंटही आल्या आहेत.

स्वर्णवचे अपहरणकर्ते कोण?

डूग्गूचा तातडीने सुत्रं हालवत स्वर्णवचा शोध घेतला, मात्र त्याचे अपहरणकर्ते कोण आहेत. हे अजूनही कळाले नाही. त्याच्या शोधासाठी पोलीस पथकांच्या माध्यमातून शोध सुरु होता. खूप गुप्तता पाळून हा तपास सुरू होता, जवळपास तीनशेहून अधिक पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते. अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले आहे. चतुश्रृंगी पोलिसात याबाबत तक्रार आली होती, कशासाठी अपहरण केलं किंवा हा याचे कारण पोलीस शोधत आहेत. अखेर मुलाला आठ दिवसांनंतर शोधण्यात यश आले आहे.

Video | ज्या वॉचमनकाकांकडे डुग्गूला सोडलं, त्यांनी टीव्ही 9शी बोलताना काय सांगितलं?

Pune Kidnapping Case Balewadi | डूग्गू जिथं सापडला, तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील थरार, पाहा काय घडलं?

Pune Kidnapping Case Balewadi| चिमुरड्या डुग्गू कसा सापडला ; पोलिसांनी शोधले की? अपहरणकर्ता सोडून पळाला? वाचा अपहरणाचा संपूर्ण घटनाक्रम

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें