VIDEO | दारूने टल्ली झालेल्या बॉयफ्रेंडला रस्त्यावर न सोडता खांद्यावर घेऊन गर्लफ्रेंड थेट घरी गेली

व्हिडिओत लोकेशन उघड करण्यात आले नाही. हा व्हिडिओ न्यू ईयर सेलिब्रेशनचा आहे.

VIDEO | दारूने टल्ली झालेल्या बॉयफ्रेंडला रस्त्यावर न सोडता खांद्यावर घेऊन गर्लफ्रेंड थेट घरी गेली
gf carries her drunk bf
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 08, 2023 | 10:39 AM

सोशल मीडियावर एका जोडप्याचा व्हिडिओ चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी आपल्या प्रियकराला खांद्यावर घेऊन चालताना दिसतीये. प्रियकर नशेत होता, त्यामुळे प्रेयसी त्याला उचलून घरी घेऊन जात असल्याचं सांगण्यात आलंय. हा व्हिडिओ टिकटॉकवर आतापर्यंत 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. nypost.com वृत्तानुसार, नववर्षाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली आहे. एक मुलगी बॉयफ्रेंडसोबत पार्टीला गेली होती. पण प्रियकर इतका दारूच्या आहारी गेला की त्याला चालणं कठीण झालं. मुलीने त्याला खांद्यावर उचलून घेतले. रस्त्याच्या मधोमध ही मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला खांद्यावर उचलून उभी होती.

या कपलचा हा 11 सेकंदाचा व्हिडिओ सर्वात आधी टिकटॉकवर अपलोड करण्यात आला होता. जिथे त्याला 40 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओत लोकेशन उघड करण्यात आले नाही. होय, हा व्हिडिओ न्यू ईयर सेलिब्रेशनचा आहे.

पोस्ट केल्यानंतर काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर हजारो लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी गमतीने म्हणाले- अशी गर्लफ्रेंड सापडणं कठीण आहे, तर कुणी म्हणालं- जोडीदार असावा तर असा.

व्हिडीओमध्ये मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला खांद्यावर घेऊन कशी फिरतेय ते पाहायला मिळत आहे. बॉयफ्रेंडच्या वजनामुळे तीही त्याला मध्येच सांभाळत असते. लोक इकडे तिकडे ये-जा करत आहेत आणि त्याला पाहत आहेत. काही लोक या जोडप्याची ही कृती आपल्या कॅमेऱ्यात कैद करतानाही दिसले.