
अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर तिच्या जन्मतारखेतील मूलांकाचा विशेष प्रभाव असतो. याच अंकशास्त्रात मूलांक 4 हा अत्यंत वेगळा, रहस्यमय आणि विरोधाभासांनी भरलेला मानला जातो.

मूलांक 4 असलेल्या व्यक्तींवर राहू ग्रहाचा प्रभाव अधिक असतो. राहू हा असा ग्रह आहे, जो राजाला रंक आणि रंकाला राजा बनवू शकतो असे मानले जाते. ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13 किंवा 22 तारखेला झालेला असतो त्यांचा मूलांक 4 असतो.

या लोकांचे ग्रहस्वामी राहू असल्यामुळे त्यांच्या आयुष्यात अचानक बदल, चढ-उतार आणि अनपेक्षित घटना वारंवार घडतात. मूलांक 4 असलेले लोक स्वभावाने अत्यंत हट्टी, ध्येयवेडे आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे असतात. त्यांच्यात नैसर्गिक नेतृत्वगुण असतात. मात्र, ते आपल्या भावना आणि योजना कुणाशीही सहज शेअर करत नाहीत.

हे लोक पटकन लोकांच्या प्रभावाखाली येतात आणि त्यामुळे वाईट संगतीत अडकण्याची शक्यता अधिक असते. काही वेळा नैतिकतेच्या चौकटीबाहेर जाऊन निर्णय घेण्यासही ते मागेपुढे पाहत नाहीत असं अंकशास्त्रात म्हटलं आहे.

राहूचा प्रभाव नकारात्मक झाला तर मूलांक 4 असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात अचानक संकटे, संघर्ष आणि अपयश येऊ लागते. व्यक्ती कितीही मेहनत करत असला तरी त्याला अपेक्षित यश मिळत नाही. व्यवसायात सतत तोटा होतो. नोकरी सुटते. आर्थिक अडचणी वाढतात.

राहूच्या वाईट प्रभावामुळे मूलांक 4 असलेले लोक हट्टी, रागीट आणि अहंकारग्रस्त बनतात. याचा थेट परिणाम त्यांच्या नातेसंबंधांवर होतो. ना जोडीदाराशी सूर जुळतो, ना कुटुंबीय आणि मित्रांशी. वाद, गैरसमज आणि तणाव यामुळे त्यांच्या सामाजिक आयुष्यात दुरावा निर्माण होतो. (Disclaimer): प्रिय वाचकांनो, ही माहिती केवळ सामान्य ज्योतिषीय व अंकशास्त्रीय मान्यतांवर आधारित आहे. याचा उद्देश केवळ माहिती व जागरूकता देणे हा आहे. या माहितीस कोणतीही वैज्ञानिक पुष्टी नाही. कृपया कोणताही निर्णय घेताना तज्ञांचा सल्ला घ्यावा.