1.50 लाखांचा मोबाइल बंधाऱ्यात पडला, अधिकाऱ्याने पूर्ण बंधाराच रिकामा केला…मग काय झाले…

| Updated on: May 27, 2023 | 4:57 PM

Mobile : एखाद्या अधिकाऱ्यास अधिकार मिळाले म्हणजे तो आपल्या पदाचा अन् प्रतिष्ठेचा किती गैरवापर करतो, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. एका सरकारी अधिकाऱ्याचा मोबाइल बंधाऱ्यात पडला. मग काय पूर्ण बंधारा रिकामा करण्यात आला.

1.50 लाखांचा मोबाइल बंधाऱ्यात पडला, अधिकाऱ्याने पूर्ण बंधाराच रिकामा केला...मग काय झाले...
Follow us on

कांकेर : देशात अनेक ठिकाणी उन्हाचा चटका बसत आहे. दुर्गम भागात नदी, विहिरींना पाणी नाही. हंडाभर पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते. चार-पाच किलोमीटर पायपीट करुन महिला पाणी आणत आहे. एकाबाजूला अशी परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका अधिकाऱ्याचा दीड लाखांचा मोबाइल पाण्यात पडला. मग काय त्याच्यासाठी पूर्ण बंधारा रिकामा केला गेला. लाखो लिटर पाणी वाया गेले. हे प्रकरण माध्यमांनी उघड केल्यावर आता फक्त चौकशी, नोटीस असा प्रकार सुरु आहे.

कुठे झाला प्रकार

छत्तीसगडच्या कांकेर पंखजूरमध्ये हा प्रकार घडला. अन्न निरीक्षक राजेश विश्वास आपल्या मित्रांसह परळकोट बंधाऱ्यात पार्टी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांचा दीड लाखांचा मोबाईल बंधाऱ्यात पडला. त्यावेळी त्या ठिकाणी पाण्याची पातळी 10 फूट होती. मग काय दुसऱ्या दिवशी त्यांनी 30 एचपीचे दोन पंप आणले अन् पुर्ण बंधारा रिकामा केला.

हे सुद्धा वाचा

माध्यमांमुळे उघड झाला प्रकार

प्रसारमाध्यमांतून हे प्रकरण उघड झाल्यानंतर प्रशासनाने विभागीय चौकशी सुरु केली. त्यात धरणातून सुमारे 41 लाख लिटर पाणी सोडण्यात आल्याची माहिती मिळाली. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नाराजीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न निरीक्षक विश्वास यांना निलंबित केले. दरम्यान, त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

डायव्हर्स बोलवले

धरणातून पाणी काढत असताना अन्न निरीक्षक राजेश विश्वास हे छत्री घेऊन धरणावर बसले. त्यांनी मोबाइल शोधण्यासाठी डायव्हर्स बोलवले होते. धरणाचे पाणी कमी झाल्यावर मोबाईल सापडला, पण तो चालू झाला नाही. नंतर हे प्रकरण मीडियात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी 26 मे रोजी अन्न निरीक्षकाला निलंबित केले होते. दरम्यान मोबाइलमध्ये महत्त्वाचा अधिकृत डेटा असल्याचा युक्तिवाद अन्न निरीक्षक राजेश यांनी केला आहे.