फळं, भाज्या ऑनलाइन मागवताय ? मग डिलीव्हरी बॉयचे हे प्रताप पहाच.. पुढल्या वेळेस 10 वेळा कराल विचार

ऑनलाइन फूड डिलिव्हरी मागवताना ग्राहकांनी आता अधिक सावध राहावे. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक डिलिव्हरी बॉय ग्राहकासाठीचे ब्लूबेरी पॅक उघडून त्यातील फळं खाताना दिसतो. हा धक्कादायक प्रकार पाहून ग्राहकांच्या विश्वासाला तडा गेला असून, अन्नसुरक्षा व स्वच्छतेचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. ऑनलाइन मागवलेल्या वस्तू थेट खाण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे.

फळं, भाज्या ऑनलाइन मागवताय ? मग डिलीव्हरी बॉयचे हे प्रताप पहाच.. पुढल्या वेळेस 10 वेळा कराल विचार
डिलीव्हरी बॉयचे प्रताप
| Updated on: Feb 27, 2026 | 3:25 PM

सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होतच असत पण कधी कधी एखादा व्हिडीओ विश्वास बसणार नाही असा धक्का देऊन जातो. नुकत्याच समोर आलेल्या एका क्लिपमध्ये फूड डिलिव्हरी बॉय ग्राहकासाठी ऑर्डर केलेले ब्लूबेरीचे पॅक उघडून खाताना दिसत आहे. हा प्रकार पाहून संतापाची मोठी लाट उसळली आहे. जर तुम्हीही ऑनलाइन फूड डिलिव्हरी अ‍ॅपवरून फळं-भाज्या मागवत असाल, तर हा व्हिडिओ नक्की पाहण्यासारखा आहे.

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक क्लिप व्हायरल होत आहे. यात एक डिलिव्हरी बॉय दुकानातून घेतलेले ब्लूबेरीचे पॅक उघडून त्यातील काही फळं खाताना दिसतो. नंतर उरलेला माल पुन्हा पॅक करून डिलिव्हरीसाठी पाठवतो. हा प्रकार दुसऱ्या व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. मात्र व्हिडिओ बनवला जात असतानाही त्या माणसाला काही चूक वाटलं नाही, की त्याने फळं खाणं थांबवलं नाहीच. हे पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्राहकांच्या विश्वासाशी असा खेळ होऊ नये, अशी प्रतिक्रिया लोकांकडून दिली जात आहे.

धक्कादायक व्हिडिओ समोर

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये एक डिलिव्हरी पार्टनर, ग्राहकासाठी नेण्यात येणाऱ्या ब्लूबेरीच्या पॅकमधून फळं काढून खाताना दिसतो. व्हिडिओमध्ये तो दुकानाबाहेर उभा असून, तिथेच तो आपल्या बॅगमधून फळांचा पॅक काढतो, त्यातील काही ब्लूबेरी खातो आणि नंतर तेच पॅकेट पुन्हा तसेच ठेवतो. विशेष म्हणजे हीच फळं ग्राहकापर्यंत पोहोचवायची होती. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाईल असे प्रकार थांबवायला हवेत, अशी मागणीही काहींनी केली आहे.

 

कॅमेरे समोर असूनही लाज वाटलीच नाही

व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार रेकॉर्ड केला. इतकेच नाही तर फळं खाणारा तो माणूस स्टोअरमध्ये जातानाही शूट करण्यात आलं. बाहेर आल्यानंतरही तो माणूस कॅमेऱ्याकडे पाहून निर्लज्जपणे हसत उभा राहिल्याचे दिसत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत असून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्राहकांनी विश्वास ठेवून ऑनलाइन ऑर्डर दिलेली असते, मात्र त्याच ऑर्डरबद्दल दिलेल्या ऑर्डरसोबत असा प्रकार होणे योग्य नाही, अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत.

युजर्सकडून संतापजनक प्रतिक्रिया

हा व्हिडिओ @Deepeshpatel87 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिलेला असून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका युजरने लिहिले की, “बहुतेक त्याला भूक लागली असावी, म्हणूनच त्याने खाल्लं असेल.” तर दुसऱ्या युजरने संताप व्यक्त करत म्हटलं की, “डिलिव्हरी बॉयच्या या कृतीमुळे ग्राहकांचा विश्वास तुटला आहे.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us