
पुन्हा एकदा आम्ही बेडूकांचा ऑप्टिकल भ्रम आणला आहे पण तो काहीसा वेगळा आहे. ऑप्टिकल इल्युजन्सचा गुण असा आहे की ते आपल्याला फसवण्यासाठी ओळखले जातात. अशी चित्रे आपण जे पाहतोय तेच सत्य आहे, असा विश्वास निर्माण करतात, पण तसे मुळीच नाही. हे चित्र असे आहे ज्यात बेडूक शोधायचा आहे.
खरं तर झाडाखाली रंगीबेरंगी पाने पडली आहेत आणि त्या सर्वांचे रंग वेगवेगळे आहेत. या पानांच्या मधोमध एक बेडूक बसलेला असतो. चित्रात हा बेडूक शोधून तो कुठे आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्टिकल इल्युजनचे हे चित्र लोकांना गोंधळात टाकणारे चित्र आहे.
या फोटोची गंमत म्हणजे हा बेडूक अजिबात दिसत नाही. पडलेली काही पाने लाल रंगाची, तर काही पाने गुलाबी तर काही इतर रंगाची असल्याचे चित्रात दिसत आहे.
पण या सर्व पानांच्या मधोमध तो बेडूक दिसत नाही. पण जर तुम्हाला हा बेडूक सापडला तर तुम्हाला प्रतिभावंत म्हटले जाईल. जर बेडूक सापडला नसेल तर काळजी करायचं कारण नाही पुढे आम्ही बेडूक कुठे आहे हे सांगत आहोत.
खरं तर या फोटोत हा बेडूक वरच्या बाजूला तुम्हाला दिसेल. बेडूक हा अगदी पानाच्या आकाराचा आहे. नीट पाहिलं तर चित्राच्या डाव्या बाजूला पानाखाली बेडूक चौथ्या क्रमांकावर बसलेला दिसतो. बेडूक दिसतच नाही असे चित्र लावून बसवले होते, पण नीट पाहिल्यावर बेडूक कुठे आहे हे कळते.
here is the frog