या गवतात एक साप आहे, दिसतोय का?

| Updated on: Jan 27, 2023 | 10:50 AM

दिलेल्या वेळेत तसे करण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला प्रतिभावंत म्हटले जाईल. या फोटोकडे बारकाईने पाहिलं तर त्यात साप कुठे लपलेला आहे हे तुम्हाला सहज सापडू शकतं.

या गवतात एक साप आहे, दिसतोय का?
spot the snake
Image Credit source: Social Media
Follow us on

ऑप्टिकल इल्यूजन इमेजेस अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लोक असे फोटो सोडवण्यासाठी आपला वेळ देतात, आवर्जून सोडवतात. ऑप्टिकल भ्रमाचे प्रश्न आपल्या मेंदूवर सकारात्मक प्रकारे परिणाम करू शकतात. त्यामुळे अशा मजेशीर आणि मनोरंजक खेळांशी आपलं मन जोडून ठेवणं गरजेचं आहे. हे आपले मन ताजेतवाने करण्याचे काम करते. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका फोटोने लोकांना धक्का दिला आहे आणि योग्य उत्तर शोधण्यासाठी लोक खूप धडपड करतायत. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये साप शोधायचा आहे.

इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या ऑप्टिकल इल्युजन पिक्चरमध्ये हिरव्या गवतात लपलेला साप शोधायचा आहे. लोकांना ते सहजासहजी सापडत नाही, कारण लोकांना एक टाइम बाऊंड देखील देण्यात आला आहे.

चित्रात लपलेला साप अवघ्या 7 सेकंदात शोधायचा आहे. दिलेल्या वेळेत तसे करण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला प्रतिभावंत म्हटले जाईल. या फोटोकडे बारकाईने पाहिलं तर त्यात साप कुठे लपलेला आहे हे तुम्हाला सहज सापडू शकतं. त्याचबरोबर काही लोक असेही असू शकतात ज्यांनी योग्य उत्तर दिले असेल.

आपण आतापर्यंत या चित्राकडे बारकाईने पाहिले आहे का? आत्तापर्यंत पानांशिवाय दुसरं काही पाहिलं आहे का? चित्राकडे नीट बघा. चित्रातील झाडाच्या पानांमध्ये लपलेला साप शोधणे सोपे काम नाही.

हा साप कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का, त्यामुळे घाबरू नका, आम्ही तुम्हाला उपाय नक्कीच सांगणार आहोत. चित्रात लपलेल्या सापाला शोधून काढणं हे तुमचं काम आहे. लपलेला साप शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 7 सेकंद आहेत. खालील चित्रात यावर उत्तर आहे.

here is the snake