कोडं! चित्रात लपलाय मासा, ज्याची नजर तीक्ष्ण त्यालाच दिसणार
हा फोटो नीट पाहा आणि मासा शोधण्याचा प्रयत्न करा.

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जातात. यातील काही ऑप्टिकल भ्रम आहेत. या भ्रमांमुळे तुमच्या मेंदूची दिशाभूल होते आणि योग्य उत्तर शोधण्यासाठी तुमच्या मेंदूला खूप मेहनत करावी लागते. असाच एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोवरून तुम्हाला एक मासा शोधावा लागणार आहे.
हा फोटो नीट पाहा आणि मासा शोधण्याचा प्रयत्न करा. परंतु योग्य उत्तर शोधण्यापूर्वी आपल्या मोबाइल फोनमध्ये टायमर सेट करण्यास विसरू नका.

find the fish
हे कोडे 13 सेकंदात सोडवणे फारच कमी लोकांना जमले आहे. सतत फोटो नीट निरखून पाहिला तर योग्य उत्तर मिळू शकतं.
अनेकांनी लपवलेले मासे शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण याचं योग्य उत्तर काही मोजक्याच लोकांना मिळू शकलं.
या फोटोमध्ये लपलेला मासा दिसत नसेल तर फोटोची उजवी बाजू शोधण्याचा प्रयत्न करा. तरीही जर तुम्हाला योग्य उत्तर मिळत नसेल तर काही हरकत नाही, आम्ही तुम्हाला योग्य उत्तर सांगतो.

Here is the fish
या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ऑप्टिकल भ्रम इतके मजेदार आहेत की लोकांना ते सोडवायला आवडतात.हे कोडं तुम्हीही सोडवलंत तर तुम्ही खरंच खूप हुशार आहात.
