Video | टी-20 सामन्यात पाकिस्तानने भारताला नमवलं, बीडमध्ये क्रिकेटप्रेमींनी टीव्ही फोडला, व्हिडीओ व्हायरल

पराभवानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींचा चांगलाच हिरमोड झाला. बीडमध्ये तर क्रिकेटप्रेमींनी चक्क टीव्ही फोडला आहे. या क्रिकेटप्रेमींच्या नाराजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | टी-20 सामन्यात पाकिस्तानने भारताला नमवलं, बीडमध्ये क्रिकेटप्रेमींनी टीव्ही फोडला, व्हिडीओ व्हायरल
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 6:03 PM

बीड : टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 24 ऑक्टोबर रोजी सामना रंगला. या सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. पाकिस्तानने दहा गडी राखून भारताला नमवलं. या पराभवानंतर भारतीय क्रिकेटप्रेमींचा चांगलाच हिरमोड झाला. बीडमध्ये तर क्रिकेटप्रेमींनी चक्क टीव्ही फोडला आहे. या क्रिकेटप्रेमींच्या नाराजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारताचा पराभव, चाहत्यांनी टीव्ही फोडला

भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याने भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. यावेळी पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाला. त्यामुळे भारतीयांचा मोठा हिरमोड झाला होता. भारत सामना हरल्यानंतर बीडमधील क्रिकेटप्रेमींनी मोठी नाराजी व्यक्त केलीय. बीडमधील क्रिकेटप्रेमींनी थेट टीव्हीच जमिनीवर आदळला आहे. टीव्ही फोडतानाचा हाच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

हा व्हिडीओ मूळचा बीड येथील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन क्रिकेटप्रेमी दिसत आहे. भारताचा पराभव झाल्यामुळे ते चांगलेच दु:खी झाले आहेत. त्यांनी टीम इंडियावरील राग टीव्हीवर काढलाय.  त्यांनी टीव्ही जमिनीवर आदळून तो फोडून टाकलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर मोहम्मद शमीवर शिव्यांचा भडीमार, सोशल मीडियावर ट्रोलिंग, सेहवाग-ओवैसी ट्रोलर्सवर भडकले

T20 World Cup : भारताचा पाकिस्तानविरोधात पराभव, एमएस धोनीची 5 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी खरी ठरली, VIDEO व्हायरल

IND vs PAK : भारताविरुद्ध मुलाची शानदार कामगिरी, स्टेडियममध्ये बाबर आझमच्या वडिलांना अश्रू अनावर | VIDEO