IND vs PAK : भारताविरुद्ध मुलाची शानदार कामगिरी, स्टेडियममध्ये बाबर आझमच्या वडिलांना अश्रू अनावर | VIDEO

भारतावर पाकिस्तानच्या विजयानंतर स्टेडियममधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमच्या वडिलांचा आहे.

IND vs PAK : भारताविरुद्ध मुलाची शानदार कामगिरी, स्टेडियममध्ये बाबर आझमच्या वडिलांना अश्रू अनावर | VIDEO
Babar Azam's father
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 1:55 PM

दुबई : मुलगा काहीतरी जबरदस्त करत असेल तर वडिलांसाठी यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकते. बाबर आझमने तर ते केलंय जे कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूला करता आलं नाही. विश्वचषकात पाकिस्तानने भारतावर मिळवलेल्या विजयाची स्क्रिप्ट त्याने लिहिली होती. केवळ त्याच्या नेतृत्वानेच नव्हे तर त्याच्या फलंदाजीनेही. बाबर आझम पाकिस्तानचा पहिला कर्णधार ठरला आहे, ज्याने वर्ल्डकपच्या मंचावर भारताचा पराभव केला आहे. हा पराभव देखील किरकोळ नव्हता, तर तब्बल 10 विकेट राखून पाकिस्तानने भारतावर विजय मिळवला होता. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये भारताने प्रथमच कोणत्याही संघाकडून 10 विकेट्सने पराभव पत्करला आहे. पाकिस्तानचा हा विजय आणि त्या विजयाचा शिल्पकार आपला मुलगा आहे हे पाहून बाबर आझमच्या वडिलांना प्रचंड आनंद होणारच. यावेळी बाबरच्या वडिलांना त्यांचे आनंदाश्रूदेखील रोखता आले नाहीत. (IND vs PAK: Babar Azam father crying after Pakistan’s defeated India in t20 world cup)

भारतावर पाकिस्तानच्या विजयानंतर स्टेडियममधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बाबर आझमच्या वडिलांचा आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या कर्णधाराचे वडील रडताना दिसत आहेत. हे अश्रू खरे तर आनंदाचे आहेत. हे अश्रू अभिमानाचे आहेत. आपल्या मुलाने जे काही केलं आहे याचा त्याच्या वडिलांना अभिमान आहे.

व्हिडीओ पाहा

भारताचा दारुण पराभव

अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सुरुवातीलाच खराब सुरुवात आणि सुमार फलंदाजीमुळे भारतीय संघ पराभूत झाला. आधी खराब फलंदाजीमुळे केवळ 151 धावा भारताने केल्या. ज्यानंतर पाकिस्तान संघाने अप्रतिम अशी फलंदाजी करत सामना 10 विकेट्सने खिशात घातला. विशेष म्हणजे पाकच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकं ठोकली.

भारताची अत्यंत सुमार फलंदाजी

सर्वात आधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकली त्यामुळे जिंकणारा संघ निवडेल अशी गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यामध्ये फलंदाजीची सर्वाधिक मदार असलेल्या सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अवघे 0 आणि 3 रन केले. संपूर्ण सामन्यात विराट आणि ऋषभने केवळ झुंज दिली. यात कोहलीने 57 आणि पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर कोणालाच खास कामगिरी करत आल्याने संपूर्ण संघाचा डाव 151 धावांवर 20 ओव्हरमध्ये आटोपला.

पाकिस्तानचा दमदार विजय

152 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानने सुरुवातीपासूनच फलंदाजीमध्ये एक वेगळाच क्लास दाखवला. दोन्ही सलामीवीर बाबर आजम आणि रिजवान यांनी उत्कृष्ट अर्धशतक झळकावली. बाबरने 52 चेंडूत 68 धावा केल्या. तर रिजवानने 55 चेंडूत 79 धावा केल्या. भारताच्या एकाही गोलंदाजाला खास तर नाही किमान सुमार गोलंदाजीही करता आली नाही. एकही विकेट न घेता आल्याने भारताचा 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव झाला आहे.

इतर बातम्या

India vs Pakistan : पाकिस्तानी खेळाडू आणि विराटच्या मिठीची जगभर चर्चा, Video तुफान व्हायरल

India vs Pakistan T20 World Cup VIDEO | रोहित शर्माच्या खेळीवरुन पत्रकाराचा खोचक प्रश्न, विराटने आधी रोखून पाहिलं, मग मान खाली घालून हसत सुटला

T20 World Cup 2021 मध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा भिडू शकतात, वाचा कसा, कुठे होऊ शकतो आमना-सामना

(IND vs PAK: Babar Azam father crying after Pakistan’s defeated India in t20 world cup)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.